Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 38 / Mantra 8

28 Mantra
38/8
Devata- इन्द्रो देवता Rishi- दीर्घतमा ऋषिः Chhand- अष्टिः Swara- मध्यमः
Mantra with Swara
इन्द्रा॑य त्वा॒ वसु॑मते रु॒द्रव॑ते॒ स्वाहेन्द्रा॑य त्वादि॒त्यव॑ते॒ स्वाहेन्द्रा॑य त्वाभिमाति॒घ्ने स्वाहा॑। स॒वि॒त्रे त्व॑ऽऋभु॒मते॑ विभु॒मते॒ वाज॑वते॒ स्वाहा॒ बृह॒स्पत॑ये त्वा वि॒श्वदे॑व्यावते॒ स्वाहा॑॥८॥

इन्द्रा॑य। त्वा॒। वसु॑मत॒ इति॒ वसु॑ऽमते। रु॒द्रव॑त॒ इति॑ रु॒द्रऽव॑ते। स्वाहा॑। इन्द्रा॑य। त्वा॒। आ॒दि॒त्यव॑त॒ इत्या॑दि॒त्यऽव॑ते। स्वाहा॑। इन्द्रा॑य। त्वा॒। अ॒भि॒मा॒ति॒घ्न इत्य॑भिऽमाति॒घ्ने। स्वाहा॑ ॥ स॒वि॒त्रे। त्वा॒। ऋ॒भु॒मत॒ इत्यृ॑भु॒ऽमते॑। वि॒भु॒मत॒ इति॑ विभु॒ऽमते॑। वाज॑वत॒ इति॒ वाज॑ऽवते। स्वाहा॑। बृह॒स्पत॑ये। त्वा॒। वि॒श्वदे॑व्यावते। वि॒श्वेदे॑व्यवत॒ इति॑ वि॒श्वऽदे॑व्यऽवते। स्वाहा॑ ॥८ ॥

Mantra without Swara
इन्द्राय त्वा वसुमते रुद्रवते स्वाहेन्द्राय त्वादित्यवते स्वाहेन्द्राय त्वाभिमातिघ्ने स्वाहा । सवित्रे त्वऽऋभुमते विभुमते वाजवते स्वाहा । बृहस्पतये त्वा विश्वदेव्यावते स्वाहा ॥

इन्द्राय। त्वा। वसुमत इति वसुऽमते। रुद्रवत इति रुद्रऽवते। स्वाहा। इन्द्राय। त्वा। आदित्यवत इत्यादित्यऽवते। स्वाहा। इन्द्राय। त्वा। अभिमातिघ्न इत्यभिऽमातिघ्ने। स्वाहा॥ सवित्रे। त्वा। ऋभुमत इत्यृभुऽमते। विभुमत इति विभुऽमते। वाजवत इति वाजऽवते। स्वाहा। बृहस्पतये। त्वा। विश्वदेव्यावते। विश्वेदेव्यवत इति विश्वऽदेव्यऽवते। स्वाहा॥८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(विवाह संस्काराच्या पाणिग्रहण विधीवेळी) ^शब्दार्थ - (पती व पत्नी एकमेकास उद्देशून म्हणतात) हे प्रिय पती हे पत्नी, मी (पती/पत्नी) (स्वाहा) सत्य वाणीद्वारे (वसुमते) प्रभूत धनासाठी आणि (इन्द्राय) उत्तम ऐश्‍वर्यमय संतानासाठी (त्वा) तुला/तुम्हाला ग्रहण करतो/करते/. (स्वाहा) उत्तम क्रियाद्वारे (आदित्यवते) समग्र पांडित्यसंपन्न आणि (रुद्रवते) दृढ प्राण शक्ती आणि शारीरिक बळ असणार्‍या (इन्द्राय) दुःखनाशक संतानासाठी (त्वा) तुझा/तुमचा स्वीकार/करते. (सवाहा) तसेच सत्य वाणीद्वारे (सत्य म्हणत सांगतो/सांगते की) (अभिमातिघ्ने) शत्रुसंहारक अशा (इन्द्राय) उत्तम ऐश्‍वर्यदाता संतानकरिता (त्वा) तुझा/तुमचा स्वीकार करते/करतो. (स्वाहा) सत्य क्रियेद्वारे (सवित्रे) सूर्यविद्येचा ज्ञाता (वैज्ञानिक) (ऋभुमते) अनेक बुद्धिमंतांचा सहकारी अशा आणि (विभुवते) विभु म्हणजे व्यापक अव्याशादी पदार्था विषयीचा ज्ञाता अशा संतानासाठी तुझा/तुमचा स्वीकार करते/करतो. तसेच (वाजवते) पुष्कळ अन्न-धान्य देणार्‍या संतानासाठी (त्वा) तुझा/तुमचा स्वीकार करतो/करते. (स्वाहा) सत्य म्हणतो/म्हणते की (बृहस्पतये) महान वेदवाणीचा रक्षक आणि (विश्‍वदेव्यावते) समस्त विद्वानांचा हितैषी अशा संतानासाठी मी (त्वा) तुझे/तुमचे स्वीकार (अथवा विवाहविधीप्रसंगी हात हातात घेऊन प्राणीग्रहण/करतो/करते. ॥8॥
Essence
भावार्थ - या मंत्रात देखील (उप, यच्छामि) ७० व्या मंत्रातील या क्रियापदाची अर्थपूर्तीसाठी अनुवृत्ती होत आहे. जे पति पत्नी पृथ्वी आदी आठ वसूद्वारे चैत्र आदी बारा महिन्यांमधे ऐश्‍वर्य वाढवितात, ते आपल्या विघ्नांचा नाश करतात आणि मेधावी संतती प्राप्त करतात. अशा प्रकारे ते सर्वांची रक्षा करण्यात यशस्वी होतात. ॥8॥
Subject
स्त्री-पुरुषांनी काय करावे, याविषयी -