Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 38 / Mantra 28

28 Mantra
38/28
Devata- यज्ञो देवता Rishi- दीर्घतमा ऋषिः Chhand- स्वराड्धृतिः Swara- ऋषभः
Mantra with Swara
पय॑सो॒ रेत॒ऽआभृ॑तं॒ तस्य॒ दोह॑मशीम॒ह्युत्त॑रामुत्तरा॒ समा॑म्।त्विषः॑ सं॒वृक् क्रत्वे॒ दक्ष॑स्य ते सुषु॒म्णस्य॑ ते सुषुम्णाग्निहु॒तः।इन्द्र॑पीतस्य प्र॒जाप॑तिभक्षितस्य॒ मधु॑मत॒ऽ उप॑हूत॒ऽ उप॑हूतस्य भक्षयामि॥२८॥

पय॑सः। रेतः॑। आभृ॑त॒मित्याऽभृ॑तम्। तस्य॑। दोह॑म्। अ॒शी॒म॒हि॒। उत्त॑रामुत्तरा॒मित्युत्त॑राम्ऽउत्त॑राम्। समा॑म्। त्विषः॑। सं॒वृगिति॑ स॒म्ऽवृक्। क्रत्वे॑। दक्ष॑स्य। ते॒। सु॒षु॒म्णस्य॑। सु॒सु॒म्नस्येति॑ सुऽसु॒म्नस्य॑। ते॒। सु॒षु॒म्ण॒। सु॒सु॒म्नेति॑ सुऽसुम्न। अ॒ग्नि॒हु॒त इत्य॑ग्निऽहु॒तः ॥ इन्द्र॑पीत॒स्येतीन्द्रऽपीतस्य। प्र॒जाप॑तिभक्षित॒स्येति॑ प्र॒जाप॑तिऽभक्षितस्य। मधु॑मत॒ इति॒ मधु॑ऽमतः। उप॑हूत॒ इत्युप॑ऽहूतः। उप॑हूत॒स्येत्युप॑ऽहूतस्य। भ॒क्ष॒या॒मि॒ ॥२८ ॥

Mantra without Swara
पयसो रेतऽआभृतन्तस्य दोहमशीमह्युत्तरामुत्तराँ समाम् । त्विषः सँवृक्क्रत्वे दक्षस्य ते सुषुवाणस्य ते सुषुम्णाग्निहुतः । इन्द्रपीतस्य प्रजापतिभक्षितस्य मधुमतऽउपहूतऽउपहूतस्य भक्षयामि ॥

पयसः। रेतः। आभृतमित्याऽभृतम्। तस्य। दोहम्। अशीमहि। उत्तरामुत्तरामित्युत्तराम्ऽउत्तराम्। समाम्। त्विषः। संवृगिति सम्ऽवृक्। क्रत्वे। दक्षस्य। ते। सुषुम्णस्य। सुसुम्नस्येति सुऽसुम्नस्य। ते। सुषुम्ण। सुसुम्नेति सुऽसुम्न। अग्निहुत इत्यग्निऽहुतः॥ इन्द्रपीतस्येतीन्द्रऽपीतस्य। प्रजापतिभक्षितस्येति प्रजापतिऽभक्षितस्य। मधुमत इति मधुऽमतः। उपहूत इत्युपऽहूतः। उपहूतस्येत्युपऽहूतस्य। भक्षयामि॥२८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ : हे शोभायमान कीर्तीमंत (सुषुम्ण) (महोदय), आपण जसे (पयसः) जल आणि दुधाच्या सेवनाद्वारे (रेतः) तस्य) तशी पराक्रम (वा कार्यशक्ती) (आभृतम्) प्राप्त वा धारण केली आहे, (दोहम्) पूर्णत्व आणि (उत्तरामुत्तराम्) उत्तरोत्तर वृद्धी (समाम्) आम्ही योग्यवेळी (अशीमहि) प्रपात करावी. (ते) तुमच्या (क्रत्वे) प्रमाणे कर्तुत्व आणि बुद्धी आम्हीदेखील (अशीमहि) प्राप्त करावी (असे आम्ही इच्छितो वा निश्‍चय करतो) आपल्याप्रमाणे (त्विषः) प्रकाश (दक्षस्य) बळ आणि (ते) आपले पोषण सामर्थ्य व धारण सामर्थ्य आम्हीही प्राप्त करावे. (सुषुम्णस्य) सुखदायक आणि (इन्द्रपीतस्य) सूर्याने वा जीवात्म्याने ग्रहण केलेल्या (प्रजापतिभक्षितस्य) प्रजापती ईश्‍वराने दिलेल्या अथवा जीवात्म्याने पान केलेल्या (उपहूतस्य) माझ्याजवळ आलेल्या या जलाचे वा दुधाचे दोष (संवृक्) दूर करणार्‍या मला (उपहूत) या ठिकाणी बोलावण्यात आले आहे. (अग्निहुतः) त्यामुळे अग्नीमधे होम करणारा मी (यज्ञ करून) जेवण करीन. ॥28॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी सदा वीर्यरक्षण आणि वीर्यवृद्धी करावी व विद्या आदी सद्गुणांची वृद्धी करावी, हे त्यांचे कर्तव्यच आहे. अशाप्रकारे निरंतर सुख मिळवावे. मनुष्य जशी आपल्यासाठी सुखाची कामना करतात, तसेच इतरांसाठीही सुखाची आकांक्षा धरावी. ॥28॥
Subject
मनुष्यांनी काय करावे, याविषयी -
Footnote
या अध्यायात सृष्टीमधील शुभगुणांचा स्वीकार स्वतःचे तसेच इतरांचे पोषण, यज्ञाद्वारे जगातील पदार्थांचे शुद्धीकरण, सर्व सुखप्राप्तीची साधनें, धर्माचे पालन व अनुष्ठान, पोषणवृद्धी, ईश्‍वराच्या गुणांचे वर्णन, सर्वथा बलवर्धन आणि सुखाचा उपभोग याविषयी वर्णन केले आहे. त्यामुळे या (३८ व्या) अध्यायाच्या अर्थाची संगती या पूर्वीच्या (३७व्या) अध्यायाच्या अर्थाशी आहे असे जाणावे. ॥^यजुर्वेद हिन्दी भाष्याच्या ३८व्या अध्यायाच्या मराठी भाष्यानुवाद समाप्त