Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 38 / Mantra 21

28 Mantra
38/21
Devata- यज्ञो देवता Rishi- दीर्घतमा ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
घर्मै॒तत्ते॒ पुरी॑षं॒ तेन॒ वर्द्ध॑स्व॒ चा च॑ प्यायस्व।व॒र्द्धि॒षी॒महि॑ च॒ व॒यमा च॑ प्यासिषीमहि॥२१॥

घर्म॑। ए॒तत्। ते॒। पुरी॑षम्। तेन॑। वर्द्ध॑स्व। च॒। आ। च॒। प्या॒य॒स्व॒ ॥ व॒र्द्धि॒षी॒महि॑। च॒। व॒यम्। आ। च॒। प्या॒सि॒षी॒म॒हि॒ ॥२१ ॥

Mantra without Swara
घर्मैतत्ते पुरीषन्तेन वर्धस्व चा च प्यायस्व । वर्धिषीमहि च वयमा च प्यासिषीमहि ॥

घर्म। एतत्। ते। पुरीषम्। तेन। वर्द्धस्व। च। आ। च। प्यायस्व॥ वर्द्धिषीमहि। च। वयम्। आ। च। प्यासिषीमहि॥२१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (घर्म) अत्यंत पूजनीय आणि सर्वतः प्रकाशमान जगदीश्‍वर, अथवा विद्वान महोदय, (एतत्) हे जे (ते) आपले (पुरीषम्) व्यापकत्व अथवा पालनधर्म आहे (परमेश्‍वर व्यापक व पालक आहे आणि विद्वान ज्ञानदाता आहे) (तेन) त्या धर्माद्वारे आपण (वर्द्धस्व) वृद्धिंगत व्हा (आपले पालकत्व वाढावे) (च) आणि त्याद्वारे आपण इतरांना वाढवा. आपण स्वतःही (आ, प्यायस्व) पुष्ट व्हा (च) इतरांनाही पुष्ट करा. आपल्या कृपेने जसे आम्ही (वर्द्धिषीमहि) पूर्ण वृद्धी पावावी (च) तसे आम्ही इतरांचाही उत्कर्ष करावा. (च) याशिवाय जसे आम्ही (आ, प्यासिषीमहि) सर्वतः उत्कर्ष पावावा, तसे आम्ही सदा इतरांचीही उन्नती घडवावी. ॥२१॥
Essence
भावार्थ - या मंत्रात श्‍लेष आणि वाचकलुप्तोपमा हे दोन अलंकार आहेत. (पुरीषम्) या शब्दात श्‍लेष आहे, म्हणजे त्याचे दोन अर्थ निघतात) हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे सर्वव्यापी ईश्‍वर सर्वांचे रक्षण-पोषण केले आहे, तद्वत उन्नतीप्राप्त लोकांनी समाजातील (दुर्बळ दीन) जनांची उन्नती घडविली पाहिजे. ॥२१॥
Subject
पुन्हा, तोच विषय -