Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 38 / Mantra 2

28 Mantra
38/2
Devata- सरस्वती देवता Rishi- आथर्वण ऋषिः Chhand- निचृद्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
इड॒ऽएह्यदि॑त॒ऽएहि॒ सर॑स्व॒त्येहि॑।असा॒वेह्यसा॒वेह्यसा॒वेहि॑॥२॥

इडे॑। एहि॑। अदि॑ते। एहि॑। सर॑स्वति। एहि॑ ॥ असौ॑। एहि॑। असौ॑। एहि॑। असौ॑। एहि॑ ॥२ ॥

Mantra without Swara
इडऽएहिऽअदितऽएहि सरस्वत्त्येहि । असावेह्यसावेह्यसावेहि ॥

इडे। एहि। अदिते। एहि। सरस्वति। एहि॥ असौ। एहि। असौ। एहि। असौ। एहि॥२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (वर वधूला उद्देशून) (दोघांनी एकमेकाच्या गुण-स्वभावाची ओळख करून घेतली असल्यामुळे स्वयंवर विवाह-पद्धती प्रसंगी वराचे कथन पत्नी उद्देशून आहे) हे (इडे) सुसंस्कारित वाणीची स्वामीनी (वधू) तू मला (वराला) (एहि) प्राप्त हो. (असौ) तो वर म्हणजे मी तुला प्राप्त होत असून तू त्याला म्हणजे मला (एहि) प्राप्त हो. हे (अदिते) अखंड आनंददायिनी तू निरंतर आनंद (एहि) प्राप्त कर. जो (असौ) तो (वर म्हणजे मी) तुला अखंड आनंद देणारे, त्याला म्हणजे मला तू (एहि) प्राप्त हो. हे (सरस्वति) प्रभूत ज्ञानवती स्त्री (वधू) तू विद्वान पतीला (मला) (एहि) प्राप्त हो. जो (असौ) तो (मी) सुशिक्षित पुरुष आहे, त्याला तू (एहि) प्राप्त हो. ॥2॥
Essence
भावार्थ - जेव्हा स्त्रीला अथवा पुरुषाला विवाह करण्याची इच्छा असेल, तेव्हा ब्रह्मचर्य-पालन आणि विद्या या विषयीचे एकमेकाचे आचरण व धर्मकर्त्तव्यादीचे ज्ञान पूर्वी जाणून घ्यावे व नंतरच विवाह करावा. ॥2॥
Subject
स्त्री-पुरुष यांनी विवाह कशाप्रकारे करावा, याविषयी -