Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 38 / Mantra 19

28 Mantra
38/19
Devata- यज्ञो देवता Rishi- दीर्घतमा ऋषिः Chhand- निचृदुपरिष्टाद्बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
क्ष॒त्रस्य॑ त्वा प॒रस्पा॑य॒ ब्रह्म॑णस्त॒न्वं पाहि।विश॑स्त्वा॒ धर्म॑णा व॒यमनु॑ क्रामाम सुवि॒ताय॒ नव्य॑से॥१९॥

क्ष॒त्रस्य॑ त्वा॒। प॒रस्पा॑य। प॒रःपा॒येति॑ प॒रःऽपा॑य। ब्रह्म॑णः। त॒न्व᳖म्। पा॒हि ॥ विशः॑। त्वा॒। धर्म॑णा। व॒यम्। अनु॑। क्रा॒मा॒म। सु॒वि॒ताय॑। नव्य॑से ॥१९ ॥

Mantra without Swara
क्षत्रस्य त्वा परस्पाय ब्रह्मणस्तन्वम्पाहि । विशस्त्वा धर्मणा वयमनु क्रामाम सुविताय नव्यसे ॥

क्षत्रस्य त्वा। परस्पाय। परःपायेति परःऽपाय। ब्रह्मणः। तन्वम्। पाहि॥ विशः। त्वा। धर्मणा। वयम्। अनु। क्रामाम। सुविताय। नव्यसे॥१९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (राजपुरूष म्हणतात) हे राजन् अथवा हे महाराणी, (परस्पाय) ज्या कर्मामुळे इतरांची रक्षा होते, अशी कर्में करीत आपण (क्षत्रस्य) क्षत्रियकुळांचे आणि (ब्रह्मणः) वेदज्ञ क्षत्रियकुळांचे रक्षण करणार्‍या (त्वा) आपल्या (तन्वम्) शरीराचे (पाहि) रक्षण करा (कारण की आपण सुरक्षित व जीवित राहिला, तर क्षत्रिय, ब्राह्मण सकुशल राहतील) ज्याप्रमाणे (वयम्) आम्ही (राजपुरूष) (नवस्ये) नवीन (सुविताय) ऐश्‍वर्यप्राप्त्यर्थ (धर्माणा) धर्मासह (अनुक्रामाम) आपल्याशी अनुकूल राहू, त्या प्रमाणेच (विशः) प्रजाजनांनी देखील धर्ममार्गावर चालत (त्वा) आपल्याशी अनुकूल राहून चालावे. ॥19॥
Essence
भावार्थ - राजा आणि राजपुरूष यांचे कर्तव्य आहे की धर्ममार्गावर चालत प्रजेचे रक्षण करावे. त्याचप्रमाणे प्रजा आणि राजपुरुषांचेही कर्तव्य आहे की राजाचे सदैव रक्षा करावी. अशाप्रकारे न्यायाने व नियमाने एकमेकाशी वागत राजाने व प्रजेने राज्याचे ऐश्‍वर्य वाढवीत जावे. ॥19॥
Subject
राजा आणि प्रजा यांची कर्त्तव्य-कर्में, याविषयी -