Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 38 / Mantra 15

28 Mantra
38/15
Devata- पूषादयो लिङ्गोक्ता देवताः Rishi- दीर्घतमा ऋषिः Chhand- स्वराड् जगती Swara- निषादः
Mantra with Swara
स्वाहा॑ पू॒ष्णे शर॑से॒ स्वाहा॒ ग्राव॑भ्यः॒ स्वाहा॑ प्रतिर॒वेभ्यः॑। स्वाहा॑ पि॒तृभ्य॑ऽ ऊ॒र्ध्वब॑र्हिर्भ्यो घर्म॒पावभ्यः॒ स्वाहा॒ द्यावा॑पृथि॒वीभ्या॒ स्वाहा॒ विश्वे॑भ्यो दे॒वेभ्यः॑॥१५॥

स्वाहा॑। पू॒ष्णे। शर॑से। स्वाहा॑। ग्राव॑भ्य॒ इति॒ ग्राव॑ऽभ्यः। स्वाहा॑। प्र॒ति॒र॒वेभ्य॒ इति॑ प्रतिऽर॒वेभ्यः॑ ॥ स्वाहा॑। पि॒तृभ्य॒ इति॒ पि॒तृऽभ्यः॑। ऊ॒र्ध्वब॑र्हिभ्य॒ इत्यू॒र्ध्वऽब॑र्हिःऽभ्यः। घ॒र्म॒पाव॑भ्य॒ इति॑ घर्म॒ऽपाव॑भ्यः। स्वाहा॑। द्यावा॑पृथि॒वीभ्या॑म्। स्वाहा॑। विश्वे॑भ्यः। दे॒वेभ्यः॑ ॥१५ ॥

Mantra without Swara
स्वाहा पूष्णे शरसे स्वाहा ग्रावभ्यः स्वाहा प्रतिरवेभ्यः स्वाहा पितृभ्यऽऊर्ध्वबर्हिर्भ्या घर्मपावभ्यः स्वाहा द्यावापृथिवीभ्याँ स्वाहा विश्वेभ्यः देवेभ्यः ॥

स्वाहा। पूष्णे। शरसे। स्वाहा। ग्रावभ्य इति ग्रावऽभ्यः। स्वाहा। प्रतिरवेभ्य इति प्रतिऽरवेभ्यः॥ स्वाहा। पितृभ्य इति पितृऽभ्यः। ऊर्ध्वबर्हिभ्य इत्यूर्ध्वऽबर्हिःऽभ्यः। घर्मपावभ्य इति घर्मऽपावभ्यः। स्वाहा। द्यावापृथिवीभ्याम्। स्वाहा। विश्वेभ्यः। देवेभ्यः॥१५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - सर्व स्त्री पुरुषांसाठी हेच योग्य आहे की त्यानी (पूष्णे) पोषक वा बलवान पण (शरसे) हिंसकवृत्तीच्या मनुष्यासाठी (स्वाहा) सत्य क्रिया करावी म्हणजे अधर्म, दुष्कृत्यादीपासून दूर राहण्याचे उपाय करावेत. (प्रतिरवेभ्यः) शब्दाला प्रतिशब्द देणार्‍या (म्हणजे व्यर्थ वाद घालणार्‍या) मनुष्यासाठी (स्वाहा) सत्य वाणीचा (शांत राहण्याचा) प्रयोग करा वा (ग्रावभ्यः) गर्जना करणार्‍या मेघमंडळासाठी (स्वाहा) सत्य क्रिया करावी. (पाऊस पडेल, असे करावे) (ऊर्ध्वबर्हिभ्यः) यज्ञाद्वारे जगाला पावन करणार्‍या (पितृभ्यः) रक्षक ऋतूंप्रमाणे असलेल्या सज्जनांसाठी (स्वाहा) सत्य वाणीचा उपयोग करा वा (त्यांच्याशी आदराने वागावे) (द्यावापृथिवीभ्याम्) सूर्य आणि आकाश यांच्यासाठी (स्वाहा) सत्य क्रिया करावी आणि (विश्‍वेभ्यः) पृथ्वी आदीसाठी अथवा विद्वानांसाठी (स्वाहा) व स्त्री-पुरुषांनी सदा सत्यक्रिया व सत्यवाणीचाच उपयोग करावा. (हीच सर्वांची कर्त्त्यव्यें आहेत) ॥15॥
Essence
भावार्थ - स्त्री-पुरुषांचे कर्त्तव्यें आहे की त्यानी सत्य ज्ञान-विज्ञान आणि सत्य कर्म वा आचरण यांद्वारे असा पुरूषार्थ करावा की ज्यायोगे सर्वांना शक्ती व आनंद मिळेल. ॥15॥
Subject
पुन्हा, त्याच विषयी -