Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 38 / Mantra 13

28 Mantra
38/13
Devata- अश्विनौ देवते Rishi- दीर्घतमा ऋषिः Chhand- विराडुष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
अपा॑ताम॒श्विना॑ घ॒र्ममनु॒ द्यावा॑पृथि॒वी अ॑मꣳसाताम्।इ॒हैव रा॒तयः॑ सन्तु॥१३॥

अपा॑ताम्। अ॒श्विना॑। घ॒र्मम्। अनु॑। द्यावा॑पृथि॒वी इति॑ द्यावा॑पृथि॒वी। अ॒म॒ꣳसा॒ता॒म् ॥ इ॒ह। ए॒व। रा॒तयः॑। स॑न्तु॒ ॥१३ ॥

Mantra without Swara
अपातामश्विना घर्ममनु द्यावापृथिवी अमँसाताम् । इहैव रातयः सन्तु ॥

अपाताम्। अश्विना। घर्मम्। अनु। द्यावापृथिवी इति द्यावापृथिवी। अमꣳसाताम्॥ इह। एव। रातयः। सन्तु॥१३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अश्‍विना) यशवंत स्त्री-पुरूष (कीर्तीवान पति-पत्नी) तुम्ही दोघे (घर्मम्) गृहाश्रमाच्या सर्व कार्यांची (अपाताम्) रक्षा करा (सर्व आवश्यक व्यवहार पूर्ण करा) (द्यावापृथिवी) सूर्य आणि भूमी यांच्या पारस्पारिक व्यवहाराप्रमाणे गृहाश्रमातील कर्त्तव्यांचा (अन, अमंसाताम्) योग्य विचार करा, की ज्यामुळे (इह) या गृहस्थाश्रमात (रातयः) विद्यादी सुखाने तुम्ही (एव) सर्वानांच (सन्तु) देणारे व्हाल. ॥13॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जसे वायू आणि विद्युत, सूर्य आणि भूमी एकमेकाशी नियमाप्रमाणे संबंध ठेवून मिळून कार्य करतात, तद्वत पति-पत्नी यांनी एकमेकास प्रिय होऊन सर्वांना अतुलनीय सुख द्यावे. ॥13॥
Subject
पुनश्‍च, त्याच विषयी -