Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 37 / Mantra 21

21 Mantra
37/21
Devata- ईश्वरो देवता Rishi- आथर्वण ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
अहः॑ के॒तुना॑ जुषता सु॒ज्योति॒र्ज्योति॑षा॒ स्वाहा॑।रात्रिः॑ के॒तुना॑ जुषता सु॒ज्योति॒र्ज्योति॑षा॒ स्वाहा॑॥२१॥

अह॒रित्यहः॑। के॒तुना॑। जु॒ष॒ता॒म्। सु॒ज्योति॒रिति॑ सु॒ऽज्योतिः॑। ज्योति॑षा। स्वाहा॑ ॥ रात्रिः॑। के॒तुना॑। जु॒ष॒ता॒म्। सु॒ज्योति॒रिति॑ सु॒ऽज्योतिः॑। ज्योति॑षा। स्वाहा॑ ॥२१ ॥

Mantra without Swara
अहः केतुना जुषताँ सुज्योतिर्ज्यातिषा स्वाहा । रात्रिः केतुना जुषताँ सुज्योतिर्ज्यातिषा स्वाहा॥

अहरित्यहः। केतुना। जुषताम्। सुज्योतिरिति सुऽज्योतिः। ज्योतिषा। स्वाहा॥ रात्रिः। केतुना। जुषताम्। सुज्योतिरिति सुऽज्योतिः। ज्योतिषा। स्वाहा॥२१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान अथवा हे विदुषी स्त्री, आपण (स्वाहा) सत्याचरणाद्वारे (केतुना) उत्कृष्ट ज्ञान प्राप्त करून अथवा जागरूक बुद्धीद्वारे (ज्योतिषा) सूर्य आदींचे अथवा धर्माचे प्रकाश प्राप्त करून (अहः सुज्योतिः) आपल्या दिवसांचे आणि आपल्या विद्येचे (जुषताम्) सेवन करा (दिवसाचा उपयोग सत्याचरण, ज्ञानसंपादन आणि धर्मप्रसार यांसाठी करा) तसेच (स्वाहा) सत्यावाणीद्वारे आणि (केतुना) बुद्धीद्वारे व (ज्योतिषा) सत्कर्माच्या प्रकाशाने (सुज्योतिः) सुंदर ज्योतियुक्त (चंद्राच्या शीतल प्रकाशात) त्या रात्रीचे (जुषताम्) सेवन करा (अथवा ती सुखद रात्र आम्हाला अनुभवायला मिळो) ॥२१॥
Essence
भावार्थ - जे स्त्री-पुरूष दिवसा झोप घेणे सोडून व रात्रीचे जागरण सोडून युक्त आहार-विहार करीत ईश्‍वरोपासनेत तल्लीन असतात, दिवस व रात्र त्यांच्यासाठी सुखकर होतात. अशा आचरणामुळे जसजशी बुद्धी वा ज्ञान वाढते, तसतसे माणसांनी अनुष्ठान वा आचरण करावे. ॥२१॥
Subject
पुन्हा तोच विषय -
Footnote
या अध्यायात ईश्‍वर, योगी, सुर्य, पृथ्वी, यज्ञ, सन्मार्ग, स्त्री, पती, तसेच पितासमान परमेश्‍वराचे वर्णन असून उचित आहार-विहार करणे, या विषयी कथन केले आहे. यामुळे या (३७ ) व्या अध्यायाच्या अर्थाची संगती या पूर्वीच्या (३६ ) व्या अध्यायाशी आहे, असे जाणावे. ॥^यजुर्वेद हिन्दी भाष्याचा ३७ व्या अध्यायाचा मराठी भाष्यनुवाद समाप्त