Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 37 / Mantra 19

21 Mantra
37/19
Devata- ईश्वरो देवता Rishi- आथर्वण ऋषिः Chhand- विराडुष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
हृ॒दे त्वा॒ मन॑से त्वा दि॒वे त्वा॒ सूर्य्या॑य त्वा।ऊ॒र्ध्वोऽअ॑ध्व॒रं दि॒वि दे॒वेषु॑ धेहि॥१९॥

हृ॒दे। त्वा॒। मन॑से। त्वा॒। दि॒वे। त्वा॒। सूर्य्या॑य। त्वा॒। ऊ॒र्ध्वः। अ॒ध्व॒रम्। दि॒वि। दे॒वेषु॑। धे॒हि॒ ॥१९ ॥

Mantra without Swara
हृदे त्वा मनसे त्वा दिवे त्वा सूर्याय त्वा । ऊर्ध्वा अध्वरन्दिवि देवेषु धेहि ॥

हृदे। त्वा। मनसे। त्वा। दिवे। त्वा। सूर्य्याय। त्वा। ऊर्ध्वः। अध्वरम्। दिवि। देवेषु। धेहि॥१९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे जगदीश्‍वरा, (हृदे) हृदयाच्या चैतन्य, (उत्साह व आनंदासाठी) आम्ही (तुमचे उपासक) (त्वा) तुला विनंती करीत आहोत. (मनसे) अंतःकरण विज्ञानवान होण्यासाठी आम्ही (त्वा) तुला आणि (दिवे) हृदयात बुद्धीत विद्या-ज्ञानाचा प्रकाश होण्यासाठी अथवा विद्युतशास्त्रासाठी आम्ही (त्वा) तुझे ध्यान करीत आहोत. (सूर्याय) सूर्य आदी लोकांचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आम्ही (त्वा) तुझे ध्यान करीत आहोत. परमेश्‍वरा, तू (ऊर्ध्वः) सर्वोत्कष्ट आहेस, आम्हाला (दिवि) उत्तम कर्म व आचरण करण्यासाठी आणि (देवेषु) विद्वज्जनांनी (अध्वरम्) ईहंसामय यम करावे, यासाठी तू आम्हा उपासकांना (धेहि) धारण कर. आम्हांस सहाय्य कर. ॥19॥
Essence
भावार्थ - जे मनुष्य खर्‍या मनाने आत्मा आणि अंतःकरणाच्या शुद्धीसाठी तसेच सृष्टिविद्येच्या ज्ञानासाठी ईश्‍वराची उपासना करतात, तो कृपाळू ईश्‍वर त्यांना विद्या आणि धर्म प्रदान करतो आणि त्यांना दुःखापासून मुक्त करतो. ॥19॥
Subject
पुन्हा, त्या विषयी -