Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 37 / Mantra 11

21 Mantra
37/11
Devata- सविता देवता Rishi- दध्यङ्ङाथर्वण ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
य॒माय॑ त्वा म॒खाय॑ त्वा॒ सूर्य्य॑स्य त्वा॒ तप॑से।दे॒वस्त्वा॑ सवि॒ता मध्वा॑नक्तु पृथि॒व्याः सꣳस्पृश॑स्पाहि।अ॒र्चिर॑सि शो॒चिर॑सि॒ तपो॑ऽसि॥११॥

य॒माय॑। त्वा॒। म॒खाय॑। त्वा॒। सूर्य्य॑स्य। त्वा॒। तप॑से। दे॒वः। त्वा॒। स॒वि॒ता। मध्वा॑। अ॒न॒क्तु॒। पृ॒थि॒व्याः। स॒ꣳस्पृश॒ इति॑ स॒म्ऽस्पृशः॑। पा॒हि॒। अ॒र्चिः। अ॒सि॒। शो॒चिः। अ॒सि॒। तपः॑। अ॒सि॒ ॥११ ॥

Mantra without Swara
यमाय त्वा मखाय त्वा सूर्यस्य त्वा तपसे देवस्त्वा सविता मध्वानक्तु पृथिव्याः सँस्पृशस्पाहि । अर्चिरसि शोचिरसि तपो सि ॥

यमाय। त्वा। मखाय। त्वा। सूर्य्यस्य। त्वा। तपसे। देवः। त्वा। सविता। मध्वा। अनक्तु। पृथिव्याः। सꣳस्पृश इति सम्ऽस्पृशः। पाहि। अर्चिः। असि। शोचिः। असि। तपः। असि॥११॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान, (सरिता) तो ऐश्‍वर्यवान आणि (देवः) दानशील पुरूष (मखाय) (तू करीत असलेल्या) यज्ञासाठी आणि (यमाय) त्याच्या नियम-नियमनासाठी (त्वा) आपणाला (स्वीकारीत आहे) तसेच (सूर्यस्य) सर्वांचा प्रेरक जो ईश्‍वर त्याच्या उपासनेसाठी व (तपसे) धर्मानुष्ठानासाठी (त्वा) तो आपला स्वीकार करो (पृथिव्याः) भूमीविषयी (त्वा) आपणाला (मध्वा) माधुर्यभावनेने (अनक्तु) संयुक्त करो. (तुम्हाला त्या दानी पुरूषाने प्रेमाने वागवावे) आपण आपल्या (संस्पृशः) सम्यक स्पर्शाद्वारे (सहवासाद्वारे) (पाहि) आमची रक्षा करा-कारण आपण (अर्चिः) तेजस्वी (असि) आहात आणि (शोचिः) अग्नीच्या ज्वालेप्रमाणे पवित्र (असि) आहात तसेच (तपः) धर्माविषयी कष्ट सोसणारे (असि) आहात. यामुळे (त्वा) आम्ही आपला सत्कार करतो. ॥11॥
Essence
भावार्थ -जे मनुष्य योग्य आचरण करीत कीर्तीवंत होतात, त्यांना दुःखाचा स्पर्श होत नाही (ते कधी दुःखी होत नाहींत, एवढेच नव्हे तर ते दुष्टांना पीडित करून श्रेष्ठजनांना सुखी करतात. ॥11॥
Subject
सज्जन कसे असतात, याविषयी -