Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 37 / Mantra 1

21 Mantra
37/1
Devata- सविता देवता Rishi- दध्यङ्ङाथर्वण ऋषिः Chhand- निचृदुष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
दे॒वस्य॑ त्वा सवि॒तुः प्र॑स॒वेऽश्विनो॑र्बा॒हुभ्यां॑ पू॒ष्णो हस्ता॑भ्याम्। आ द॑दे॒ नारि॑रसि॥१॥

दे॒वस्य॑। त्वा॒। स॒वि॒तुः। प्र॒स॒व इति॑ प्रऽस॒वे। अ॒श्विनोः॑। बा॒हुभ्या॒मिति॑ बा॒हुभ्या॑म्। पूष्णः॑। हस्ता॑भ्याम्। आ। द॒दे॒। नारिः॑। अ॒सि॒ ॥१ ॥

Mantra without Swara
देवस्य त्वा सवितुः प्रसवेश्विनोर्बाहुभ्याम्पूष्णो हस्ताभ्याम् । आददे नारिरसि ॥

देवस्य। त्वा। सवितुः। प्रसव इति प्रऽसवे। अश्विनोः। बाहुभ्यामिति बाहुभ्याम्। पूष्णः। हस्ताभ्याम्। आ। ददे। नारिः। असि॥१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान, आपण (नारिः) नायक (असि) आहात. यामुळे मी (एक जिज्ञासू विद्यार्थी) (सवितुः) जगदुत्पादक, (देवस्य) समग्र सुखदाता (प्रसवे) परमेश्‍वराने उत्पन्न केलेल्या या जगात (अश्‍विनोः) अध्यापक आणि उपदेशक गण यांच्या (बाहुभ्याम्) बळ आणि पराक्रम (ज्ञान आणि विज्ञान) तसेच (पूष्णः) पुष्टिकर्त्ता मनुष्याच्या (हस्ताभ्याम्) (वैश्य अथवा उदार मना श्रीमंताच्या) हातांनी (त्वा) आपराला )आ, ददे) यथोचित प्रकारे ग्रहण करीत आहे (अध्यापकांचे ज्ञान आणि दानी मनुष्याच्या दानामुळे विद्वानापर्यंत जाऊन विद्या ग्रहण करी तआहे. ॥1॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यानो, तुम्ही उत्तम विद्वानांजवळ जाऊन त्याच्यापासून विद्या, सुशिक्षा प्राप्त करून या सृष्टीत (समाजात) नायक व्हा. जननेता व्हा. ॥1॥
Subject
आता सदतिसाव्या अध्यायाचा आरंभ होत आहे. या अध्यायाच्या प्रथम मंत्रात, मनुष्यांनी काय केले पाहिजे, याविषयी वर्णन केले आहे-