Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 36 / Mantra 6

24 Mantra
36/6
Devata- इन्द्रो देवता Rishi- वामदेव ऋषिः Chhand- पादनिचृद्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
अ॒भी षु णः॒ सखी॑नामवि॒ता ज॑रितॄ॒णाम्।श॒तं भ॑वास्यू॒तिभिः॑॥६॥

अ॒भी। सु। नः॒। सखी॑नाम्। अ॒वि॒ता। ज॒रि॒तॄ॒णाम् ॥ श॒तम्। भ॒वा॒सि॒। ऊ॒तिभिः॑६ ॥

Mantra without Swara
अभी षु णः सखीनामविता जरितऋृणाम् । शतम्भवास्यूतये ॥

अभी। सु। नः। सखीनाम्। अविता। जरितॄणाम्॥ शतम्। भवासि। ऊतिभिः६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे जगदीश्‍वर, आपण (शतम्) अगणित ऐश्‍वर्य देणारे असून (अभि, उतिभिः) सर्वतः आमची रक्षा करीत (नः) आमच्या (सखीनाम्) मित्रांचे आणि (जरितृणाम्) आपली खर्‍या मनाने स्तुती करणा्ऱ्यांचेही (अविता) रक्षण करणारे (सु, भवासि) उत्तमप्रकारे व्हा (वा होता). यामुळे आम्ही आपली उपासना करतो. ॥6॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यानो, जो माणूस राग-द्वेषापासून दूर असून, कोणाविषयीही वैरभाव न ठेवता सर्वाविषयी मैत्री भाव ठेवतो, अशा सर्व मित्राना, मनुष्यांना जो रक्षा करतो, तुम्ही त्या परमेश्‍वराची नित्य सेवा (उपासना) करा. ॥6॥
Subject
पुनश्‍च त्याच विषयी -