Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 36 / Mantra 24

24 Mantra
36/24
Devata- सूर्यो देवता Rishi- दध्यङ्ङाथर्वण ऋषिः Chhand- भुरिग् ब्राह्मी Swara- धैवतः
Mantra with Swara
तच्चक्षु॑र्दे॒वहि॑तं पु॒रस्ता॑च्छु॒क्रमुच्च॑रत्। पश्ये॑म श॒रदः॑ श॒तं जीवे॑म श॒रदः॑ श॒तꣳ शृणु॑याम श॒रदः॑ श॒तं प्र ब्र॑वाम श॒रदः॑ श॒तमदी॑नाः स्याम श॒रदः॑ श॒तं भूय॑श्च श॒रदः॑ श॒तात्॥२४॥

तत्। चक्षुः॑। दे॒वहि॑त॒मिति॑ दे॒वऽहि॑तम्। पु॒रस्ता॑त्। शु॒क्रम्। उत्। च॒र॒त्। पश्ये॑म। श॒रदः॑। श॒तम्। जीवे॑म। श॒रदः॑। श॒तम्। शृणु॑याम। श॒रदः॑। श॒तम्। प्र। ब्र॒वा॒म॒। श॒रदः॑। श॑तम्। अदी॑नाः। स्या॒म॒। श॒रदः॑। श॒तम्। भूयः॑। च॒। श॒रदः॑। श॒तात् ॥२४ ॥

Mantra without Swara
तच्चक्षुर्देवहितम्पुरस्ताच्छुक्रमुच्चरत् । पश्येम शरदः शतञ्जीवेम शरदः शतँ शृणुयाम शरदः शतम्प्र ब्रवाम शरदः शतमदीनाः स्याम शरदः शतम्भूयश्च शरदः शतात् ॥

तत्। चक्षुः। देवहितमिति देवऽहितम्। पुरस्तात्। शुक्रम्। उत्। चरत्। पश्येम। शरदः। शतम्। जीवेम। शरदः। शतम्। शृणुयाम। शरदः। शतम्। प्र। ब्रवाम। शरदः। शतम्। अदीनाः। स्याम। शरदः। शतम्। भूयः। च। शरदः। शतात्॥२४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे परमेश्‍वर, आपण (देवहितम्) विद्वज्जनांचे हितकर्ता असून (शुक्रम्) सर्वथा शुद्ध आहात. (चक्षुः) नेत्राप्रमाणे आम्हाला नेत्राप्रमाणे हे सर्व जग दाखविणारे असून (पुरस्तात्) पूर्वीपासून म्हणजे अनादिकाळापासून (उत्, चरत्) उत्तम रीतीने सर्वकाही जाणणारे आहात. (आम्ही आपणांस अशी प्रार्थना करतो की आम्ही) (तत्) त्या चेतम ब्रह्म असलेल्या आपरास (शरदः शतम्) शंभर वर्षापर्यंत (पश्येम) पाहू (आपण निर्माण केलेल्या या सृष्टीत पाहू अथवा सृष्टीतील पदार्थात आपले अस्तित्व पाहू) ((शरदः शतम्) शंभर वर्षापर्यंत (जीवमे) प्राण धारण करून जीवित राहू (शरदः शतम्) शंभर वर्षापर्यंत (शृणुयाम) शास्त्रवाचन वा मंगलमय वाणी ऐकू (शरदः शतम्) शंभर वर्षापर्यंत (प्रब्रवाम) अध्यापन करू वा उपदेश करू (शरदः शतम्) शंभर वर्षापर्यंत (अदीना) दैन्य-दारिद्यापासून दूर (स्याम) असू (च) आणि (शरदः शतम्) शंभर वर्षापर्यंत अधिक काळ पाहू, जिवंत राहू ऐकू, अध्यापन आणि उपदेश करू आणि अदीन होऊन राहू (दीन वा केविलवाणे जीवन, मग ते शंभर वर्षाचे का असे ना, आम्हास नको.) ॥24॥
Essence
भावार्थ - हे परमेश्‍वर, आपल्या कृपेने आम्ही (आपले उपासक) आपण दिलेल्या वा देत असलेल्या ज्ञान-विज्ञानाद्वारे आपली सृष्टीरचना पाहत नीरोग आणि जागरूक राहू, आमची सर्व इन्द्रिये अबाधित राहून आम्ही शंभर वर्षाहून अधिक काळ जीवित राहू, सत्य शास्त्र आणि आपल्या गुणांचे वर्णन ऐकू, वेदादी शास्त्रांचे अध्यापन करू, सत्याचा वा सत्य उपदेश करू, कोणत्याही बाबतीत आम्ही परावलंबी असू नये. सदैव स्वाधीन राहून आम्ही नित्य आनंदाचा उपभोग आणि आम्ही ही मागणी करीत आहोत. ॥24॥
Subject
आता पुढील मंत्रात ईश्‍वराची प्रार्थना केली आहे -
Footnote
या अध्यायात परमेश्‍वराची प्रार्थना, सर्वांसाठी सुखाची कामना, पारस्परिक मैत्रीची आवश्यकता, दिनचर्या, धर्माचे लक्षण, आयुष्य अधिक वाढविणे आणि परमेश्‍वराला जाणणे याविषयांचे वर्णन केले आहे. या अध्यायाच्या (३६ व्या) अर्थाची संगती या पुर्वीच्या (35 व्या) अध्यायाशी आहे, असे जाणावे. ^यजुर्वेद हिन्दी भाष्याचा ३६ व्या अध्यायाचा मराठी अनुवाद समाप्त