Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 36 / Mantra 20

24 Mantra
36/20
Devata- अग्निर्देवता Rishi- लोपामुद्रा ऋषिः Chhand- भुरिग् बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
नम॑स्ते॒ हर॑से शो॒चिषे॒ नम॑स्तेऽअस्त्व॒र्चिषे॑।अ॒न्याँस्ते॑ऽअ॒स्मत्त॑पन्तु हे॒तयः॑ पाव॒कोऽअ॒स्मभ्य॑ꣳशि॒वो भ॑व॥२०॥

नमः॑। ते॒। हर॑से। शो॒चिषे॑। नमः॑। ते॒। अ॒स्तु॒। अ॒र्चिषे॑ ॥ अ॒न्यान्। ते॒। अ॒स्मत्। त॒प॒न्तु॒। हे॒तयः॑। पा॒व॒कः। अ॒स्मभ्य॑म्। शि॒वः। भ॒व॒ ॥२० ॥

Mantra without Swara
नमस्ते हरसे शोचिषे नमस्तेऽअस्त्वर्चिषे । अन्याँस्तेऽअस्मत्तपन्तु हेतयः पावको अस्मभ्यँ शिवो भव ॥

नमः। ते। हरसे। शोचिषे। नमः। ते। अस्तु। अर्चिषे॥ अन्यान्। ते। अस्मत्। तपन्तु। हेतयः। पावकः। अस्मभ्यम्। शिवः। भव॥२०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे भगवन्, हे ईश्‍वर, (हरसे) पाप-हरण करणार्‍या आणि (शोचिषे) ज्ञानाचा प्रकाश करणार्‍या (ते) आपणासाठी (नमः) आमचे नमस्कार असोत. तसेच (अर्चिषे) सतुत्य वा स्तवनीय (ते) अशा आपणासाठी (नमः) नमस्कार (अस्तु) असोत. (ते) आपले जे (हेतयः) वज्राप्रमाणे दृढ व अपरिवर्तनीय व्यवस्था आहे. ती दंड व्यवस्था (अस्मत्) आम्हांपासून (अन्यान्) भिन्न वा विरोधी अशा अन्यायी शत्रूंना (तपन्तु) दंडित करो आपण (अस्मभ्यम्) आमच्यासाठी (आपकः) पवित्र कर्त्ता आणि (शिवः) कल्याणकारी (भव) व्हा. ॥20॥
Essence
भावार्थ - हे परमेश्‍वर, आपल्या शुभ, गुण, कर्म आणि स्वभावाप्रमाणे आमचेही गुण, कर्म, स्वभाव व्हावेत, याकरिता आम्ही आपणास नमस्कार करतो. आमचा दृढ विश्वास आहे की अधर्मी लोकांना आपली व्यवस्था पीडा व दुःख देते आणि धर्मात्माजनांना आनंदित करते. अशा परम मंगलकारी स्वरूप असलेल्या आपली आम्ही उपासना करतो. ॥20॥
Subject
ईश्‍वरोपासना विषयी -