Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 36 / Mantra 15

24 Mantra
36/15
Devata- आपो देवताः Rishi- सिन्धुद्वीप ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
यो वः॑ शि॒वत॑मो॒ रस॒स्तस्य॑ भाजयते॒ह नः॑।उ॒श॒तीरि॑व मा॒तरः॑॥१५॥

यः। वः॒। शि॒वत॑म॒ इति॑ शि॒वऽत॑मः। रसः॑। तस्य॑। भा॒ज॒य॒त॒। इ॒ह। नः॒। उ॒श॒तीरिवेत्यु॑श॒तीःऽइ॑व। मा॒तरः॑ ॥१५ ॥

Mantra without Swara
यो वः शिवतमो रसस्तस्य भाजयतेह नः । उशतीरिव मातरः ॥

यः। वः। शिवतम इति शिवऽतमः। रसः। तस्य। भाजयत। इह। नः। उशतीरिवेत्युशतीःऽइव। मातरः॥१५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे श्रेष्ठ स्त्रियांनो, (वः) तुमचा (यः) जो (शिवतमः) अत्यंत कल्याणकारी (रसः) आनंदवर्धक स्नेहरूपरस आहे (पतीप्रत प्रीती, संततीप्रत वात्सल्य, लहानांकरिता प्रेम असे अनेक मधुर भाव जे तुमच्या हृदयात आहेत) (तस्य) त्या प्रीतीरसाचा (इह) या गृहस्थ संसारात (नः) आम्हाला (घरातील सर्वांना) (भाजयत) लाभ होऊ द्या. ज्याप्राणे (उशतीरिव, मातरः) पुत्रांना आई प्रेम करते, त्या मातेप्रमाणे तुम्ही (घरातील सर्वांना मातृहृद्याचे वात्सल्य व) स्नेह द्या. ॥15॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जर होम आदी प्रयत्नांद्वारे पृथ्वीवरील जल शुद्ध केले जाईल, तर ज्याप्रमाणे आई आपल्या मुला-बाळांना आणि पतिव्रता स्त्री आपल्या पतीला सुखी करते, त्याप्रमाणे जल सर्व प्राण्यांसाठी सुखकारक होईल (वा होते). ॥15॥
Subject
पुन्हा, तोच विषय -