Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 36 / Mantra 13

24 Mantra
36/13
Devata- पृथिवी देवता Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- पिपीलिकामध्या निचृदगायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
स्यो॒ना पृ॑थिवि नो भवानृक्ष॒रा नि॒वेश॑नी।यच्छा॑ नः॒ शर्म॑ स॒प्रथाः॑॥१३॥

स्यो॒ना। पृ॒थि॒वि॒। नः॒। भ॒व॒। अ॒नृ॒क्ष॒रा। नि॒वेश॒नीति॑ नि॒ऽवेश॑नी ॥ यच्छ॑। नः॒। शर्म्म॑। स॒प्रथा॒ इति॑ स॒ऽप्रथाः॑ ॥१३ ॥

Mantra without Swara
स्योना पृथिवि नो भवानृक्षरा निवेशनी । यच्छा नः शर्म सप्रथाः ॥

स्योना। पृथिवि। नः। भव। अनृक्षरा। निवेशनीति निऽवेशनी॥ यच्छ। नः। शर्म्म। सप्रथा इति सऽप्रथाः॥१३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ -पृथ्वी प्रमाणे क्षमाशील हे गृहिणी स्त्री, ज्याप्रमाणे ही (पृथिवि) भूमी (अनृक्षरा) कंटकगर्तरहित असल्यास (निवेशनी) (घर बांधण्यास व ग्राम, नगर आदी वसविण्यासाठी) सुखकारी असते, तशी तूही आम्हा (घरातील वाडवडिल व लहानधार्‍या माणसांसाठी) सुखकारीणी हो. तू (सप्रथाः) भरपूर विस्तृत होऊन (नः) आमच्यासाठी (शर्म) स्थान दे आणि अशाप्रकारे (नः) आमच्यासाठी (स्योना) सुखकारिणी होऊन तू घरात वा घरासाठी पुष्कळ (यच्छ) प्रदान कर. ॥13॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे ही पृथ्वी सर्व प्राण्यासाठी सुख व ऐश्‍वर्य देणारी आहे, त्याप्रमाणे एक विदुषी पतिव्रता स्त्री पती आदी घरातील सर्वांना आनंदित करणारी असते. ॥13॥
Subject
पतिव्रता स्त्री कशी असावी, या वषियी -
Footnote
(टीप - हा मंत्र पूर्वी ३५ व्या अध्यायात मंत्र क्र. ११ येथे आला आहे तिथे तीन शब्द अधिक आहेत)