Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 36 / Mantra 10

24 Mantra
36/10
Devata- वातादयो देवताः Rishi- दध्यङ्ङाथर्वण ऋषिः Chhand- विराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
शन्नो॒ वातः॑ पवता॒ शन्न॑स्तपतु॒ सूर्यः॑।शन्नः॒ कनि॑क्रदद्दे॒वः प॒र्जन्यो॑ऽअ॒भि व॑र्षतु॥१०॥

शम्। नः॒। वातः॑। प॒व॒ता॒म्। शम्। नः॒। त॒प॒तु॒। सूर्य्यः॑ ॥ शम्। नः॒। कनि॑क्रदत्। दे॒वः। प॒र्जन्यः॑। अ॒भि। व॒र्ष॒तु॒ ॥१० ॥

Mantra without Swara
शन्नो वातः पवताँ शन्नस्तपतु सूर्यः । शन्नः कनिक्रदद्देवः पर्जन्यो अभि वर्षतु ॥

शम्। नः। वातः। पवताम्। शम्। नः। तपतु। सूर्य्यः॥ शम्। नः। कनिक्रदत्। देवः। पर्जन्यः। अभि। वर्षतु॥१०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे परमेश्‍वर अथवा हे विद्वान महोदय, ज्यायोगे (वातः) वायू (नः) आमच्यासाठी (उपासना व यज्ञकर्म करणार्‍यासाठी) (शम्) सुखकररूपाने (पवताम्) वाहील आणि ज्यायोगे (सूर्य्यः) सूर्य (नः) आम्हाला (शम्) सुखकररीत्या (तपतु) आपला तेज व प्रकाश आम्हांस देईल (ती पद्धती वा ते कर्त्तव्य आम्हाला सांगा) तसेच ज्या योगे (कनिक्रदत्) घनघोर गर्जना करीत (देवः) उत्तम गुणरूप विद्युदग्नी (नः) आमच्यासाठी (शम्) कल्याणकारी होत आणि (पर्जन्यः) आमच्यासाठी मेघमंडळ (अभि, वर्षतु) सर्व दिशांतून पाऊस घेऊन येईल, (अशा प्रकारची रीती व नीती तुम्ही आम्हांस सांगा म्हणजे आम्ही ती सर्व कार्यें संपन्न करू). ॥10॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. हे मनुष्यानो, ज्यायोगे वायू, सूर्य, विद्युत आणि मेघ सर्वांसाठी सुखकर होतील, तुम्ही तशी अवश्य करा. ॥10॥
Subject
पुनः मनुष्यानी काय करावे, याविषयी -