Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 36 / Mantra 1

24 Mantra
36/1
Devata- अग्निर्देवता Rishi- दध्यङ्ङाथर्वण ऋषिः Chhand- पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
ऋचं॒ वाचं॒ प्र प॑द्ये॒ मनो॒ यजुः॒ प्र प॑द्ये॒ साम॑ प्रा॒णं प्र प॑द्ये॒ चक्षुः॒ श्रोत्रं॒ प्र प॑द्ये। वागोजः॑ स॒हौजो॒ मयि॑ प्राणापा॒नौ॥१॥

ऋच॑म्। वाच॑म्। प्र। प॒द्ये॒। मनः॑। यजुः॑। प्र। प॒द्ये॒। साम॑। प्रा॒णम्। प्र। प॒द्ये॒। चक्षुः॑। श्रोत्र॑म्। प्र। प॒द्ये॒ ॥ वाक्। ओजः॑। स॒ह। ओजः॑। मयि॑। प्रा॒णा॒पा॒नौ ॥१ ॥

Mantra without Swara
ऋचँवाचम्प्र पद्ये मनो यजुः प्र पद्ये साम प्राणम्प्र पद्ये चक्षुः श्रोत्रम्प्र पद्ये । वागोजः सहौजो मयि प्राणापानौ ॥

ऋचम्। वाचम्। प्र। पद्ये। मनः। यजुः। प्र। पद्ये। साम। प्राणम्। प्र। पद्ये। चक्षुः। श्रोत्रम्। प्र। पद्ये॥ वाक्। ओजः। सह। ओजः। मयि। प्राणापानौ॥१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, (मवि) (मी एक विद्वान) माझ्या आत्म्यात (प्राणोपानौ) प्राण आणि अपान, वर आणि खाली होणारे श्‍वास-प्रवास दृढ व्हावेत. माझ्या (वक्) वाणीला (ओजः) मानसिक बळ प्राप्त व्हावे. तसेच त्या वाणी आणि श्‍वासा (सह) सह मी (ओजः) शारीरिक बळ देखील प्राप्त करावे (असे मी इच्छितो) मी (ऋचम्) ऋग्वेदरूप (वाचम्) वाणी (प्र, पद्ये) प्राप्त करावी. (मनः) मनन करणार्‍या अंत:करणरूप (यजुः) यजुर्वेद (प्र, पद्ये) प्राप्त करावा (प्राणम्) प्राणाची क्रिया म्हणजे योगाभ्यास आदी उपासनेचा साधक (साम) सामवदे (प्र, पद्ये) प्राप्त करावा तसेच (चक्षुः) उत्तम दृष्टिशक्ती आणि श्रोत्रम्) श्रेष्ठ श्रवणशक्ती (प्र, पद्ये) प्राप्त करावी. हे मनुष्यहो, माझ्याप्रमाणे तुम्हीदेखील हे सर्व प्राप्त करण्याकरिता यत्नशील असावे. ॥1॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. हे विद्वज्जन, आपल्या सहवासाने ऋग्वेदाप्रमाणे माझी वाणी प्रशंसनीय व्हावी, यजुर्वेदाप्रमाणे माझे (मी एक विद्यार्थी वा साधक गृहस्थ) माझे मन मननशील व्हावे, सामवेदाप्रमाणे माझे प्राण आणि सतरा तत्त्वांनीं युक्त असे हे लिंग शरीर स्वास्थ्यमय, नीरोग, उपद्रवविरहित व्हावे आणि सशक्त सक्षम असावे. ॥1॥
Subject
आता ३६ व्या अध्यायाचा आरंभ केला जात आहे. या अध्यायाच्या प्रथम मंत्रात, विद्वानांच्या संगतीमुळे काय लाभ होातत, हा विषय सांगितला आहे -