Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 35 / Mantra 7

22 Mantra
35/7
Devata- विश्वेदेवा देवताः Rishi- आदित्या देवा वा ऋषयः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
परं॑ मृत्यो॒ऽ अनु॒ परे॑हि॒ पन्थां॒ यस्ते॑ऽ अ॒न्यऽ इत॑रो देव॒याना॑त्।चक्षु॑ष्मते शृण्व॒ते ते॑ ब्रवीमि॒ मा नः॑ प्र॒जा री॑रिषो॒ मोत वी॒रान्॥७॥

पर॑म्। मृत्यो॒ऽइति॒ मृत्यो॑। अनु॑। परा॑। इ॒हि॒। पन्था॑म्। यः। ते॒। अ॒न्यः। इत॑रः। दे॒व॒याना॒दिति॑ देव॒ऽयाना॑त् ॥ चक्षु॑ष्मते। शृ॒ण्व॒ते। ते॒। ब्र॒वी॒मि॒। मा। नः॒। प्र॒जामिति॑ प्र॒ऽजाम्। री॒रि॒षः॒। री॒रि॒ष॒ऽइति॑ रिरिषः। मा। उ॒त। वी॒रान् ॥७ ॥

Mantra without Swara
परम्मृत्योऽअनु परेहि पन्थाँयस्तेऽअन्य इतरो देवयानात् । चक्षुष्मते शृण्वते ते ब्रवीमि मा नः प्रजाँ रीरिषो मोत वीरान् ॥

परम्। मृत्योऽइति मृत्यो। अनु। परा। इहि। पन्थाम्। यः। ते। अन्यः। इतरः। देवयानादिति देवऽयानात्॥ चक्षुष्मते। शृण्वते। ते। ब्रवीमि। मा। नः। प्रजामिति प्रऽजाम्। रीरिषः। रीरिषऽइति रिरिषः। मा। उत। वीरान्॥७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्य (ते) तुजा (देवयानात्) विद्वज्जन अनुसरत असलेल्या पेक्षां (यः) जो (इतरः) भिन्न (अन्यः) वेगळा असा (यः) जो मार्ग आहे, त्या (पन्थाम्) मार्गावर तू जाऊ नकोस (अर्थात्) विद्वानांच्या मार्गावर जा) त्यामुळे (मृत्यो) मृत्यूला (परा, इहि) तू दूर जा असे म्हणू शकतोस. याप्रकारे तू (परम उत्तम देवमार्गावर (अनु) व्यवस्थितपणे मार्गक्रमण कर (चक्षुष्मते) उत्तम नेत्र असलेल्या आणि (शृण्वते) ऐकू शकणार्‍या (ते) तुज्यासाठी मी हा (ब्रवीमि) उपदेश करीत आहे. माझी इच्छा आहे की मृत्याने (नः) आमच्या प्रजेची (संतानादीची) हिंसा करू नये. आणि आमच्या वीर पुरुषांपर्यंतही मृत्यू येऊ नये. तू देखील आपल्या (प्रजाम्) संतान आदींची (मा, रीरिषः) हिंसा करू नये. म्हणजे (तू स्वत विषयवासनेत लिप्त होऊ नकोस व संतानांनाही लिप्त होऊ देऊ नकोस) (उत) आणि मृत्यूने अथवा तूदेखील (वीरान्) विद्या, शरीर आणि आत्मिक शक्तीने संपन्न वीर पुरूषांना (मा) नष्ट होऊ देऊ नये. ॥7॥^(अनुवादकाचे वक्तव्य - या मंत्रात काव्यदृष्टीने पाहिल्यास सुंदर असा आलंकारिक अर्थ निघतो, असे मला वाटते. एक योगी वा निष्ठावान ईश्‍वरभक्त मृत्यूला दरडावून सांगत आहे. अरे मृत्यू, तू दूर जा. आम्हां ईश्‍वरभक्तांकडे येऊ नकोस. तू दुर्जनांच्या, दुराचार्‍यांच्या वाटेवर जा. ईश्‍वरभक्तांकडे तुझे काही चालणार नाही. अरे तुला डोळे आहेत ना? कान आहेत ना? ऐकतेस ना मी सांगितलेलं? पाहतेस ना की हा मार्ग वा हे स्थान सज्जनांचे वा ईश्‍वरनिष्ठांचे आहे?) हे (वाक्प्रयोग लक्षत शब्दशक्तीद्वारे अर्थ घ्यावा लागतो.) नीट ऐक, आमच्या संततीला आणि आमच्या वीरपुरुषांना तू मारू नकोस वा तू मारू शकत नाहीस. जा इथून दूर जा ॥ हा असा काव्यात्मक आलंकारिक अर्थ घेतल्यास मंत्रातील भाव प्रभावकारी होत आहे.)
Essence
भावार्थ - हेच मनुष्यांच्या हिताचे आहे की त्यांनी आजीवन विद्वानांच्या मार्गाचे अनुसरण करावे आणि त्याद्वारे उत्तम अवस्था प्राप्त करावी. ब्रह्मचर्य धारण पूर्ण करून स्वयंवर विवाह करावा. लहान वयात विवाह करू नये. तसेच लहान वयात विवाह करून संतान आदींना जन्म देऊ नये. स्वतःच्या संततीलाही ब्रह्मचर्य-धारणाविषयी प्रवृत्त करावे. ॥7॥
Subject
मनुष्यांनी काय केले पाहिजे, याविषयी -