Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 35 / Mantra 6

22 Mantra
35/6
Devata- यमो देवता Rishi- सड्कसुक ऋषिः Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
प्र॒जाप॑तौ त्वा दे॒वता॑या॒मुपो॑दके लो॒के नि द॑धाम्यसौ।अप॑ नः॒ शोशु॑चद॒घम्॥६॥

प्र॒जाप॑ता॒विति॑ प्र॒जाऽप॑तौ। त्वा॒। दे॒वता॑याम्। उपो॑दक॒ इत्युप॑ऽउदके। लो॒के। नि। द॒धा॒मि॒। अ॒सौ॒ ॥ अप॑। नः॒। शोशु॑चत्। अ॒घम् ॥६ ॥

Mantra without Swara
प्रजापतौ त्वा देवतायामुपोदके लोके निदधाम्यसौ । अप नः शोशुचदघम् ॥

प्रजापताविति प्रजाऽपतौ। त्वा। देवतायाम्। उपोदक इत्युपऽउदके। लोके। नि। दधामि। असौ॥ अप। नः। शोशुचत्। अघम्॥६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे जीवात्मा, (असौ) हे इहलोक (नः) आमच्या (अद्यम्) पापाला (अप, शोशुचत्) शीघ्र शोषित वा नष्ट करो. (प्रजापतौ) प्रजेचा, सर्व मानव संतनांचा जो रक्षक (देवतायाम्) पूजनीय, परमेश्‍वराच्या ध्यानात आणि (उपोदके) (जल वा जलाशय ज्या ठिकाणी जवळ आहे अशा (लोके) दर्शनीय मनोरम स्थानात राहण्यासाठी मी (त्वा) हे जीवात्मा, तुला (निदधामि) धारण करीत आहे. (मनोरम नैसर्गिक स्थानात राहून जीवात्म्याने निरंतर ईश्‍वरोपासना करावी, हेच इहलोकाचे परम कर्त्तव्य आहे) ॥6॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यानो, जो जगदीश्‍वरास प्रार्थना केल्यानंतर मनुष्याला पापाचरणापासून दूर ठेवतो, मी (एक ज्येष्ठ उपासक) तुम्हाला त्या ईश्‍वराची भक्ती करण्यासाठी दृढ करीत आहे. यायोगे तुम्ही श्रेष्ठ सुख उपभोगण्यात यशस्वी व्हाल. ॥6॥
Subject
ईश्‍वराच्या उपासनेविषयी -