Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 35 / Mantra 22

22 Mantra
35/22
Devata- सविता देवता Rishi- आदित्या देवा वा ऋषयः Chhand- स्वराड् गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
अ॒स्मात्त्वमधि॑ जा॒तोऽसि॒ त्वद॒यं जा॑यतां॒ पुनः॑।अ॒सौ स्व॒र्गाय॑ लो॒काय॒ स्वाहा॑॥२२॥

अ॒स्मात्। त्वम्। अधि॑। जा॒तः। अ॒सि॒। त्वत्। अ॒यम्। जा॒य॒ता॒म्। पुन॒रिति॒ पुनः॑ ॥ अ॒सौ। स्वर्गायेति॑ स्वः॒ऽगाय॑। लो॒काय॑। स्वाहा॑ ॥२२ ॥

Mantra without Swara
अस्मात्त्वमधिजातोसि त्वदयञ्जायताम्पुनः । असौ स्वर्गाय लोकाय स्वाहा ॥

अस्मात्। त्वम्। अधि। जातः। असि। त्वत्। अयम्। जायताम्। पुनरिति पुनः॥ असौ। स्वर्गायेति स्वःऽगाय। लोकाय। स्वाहा॥२२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ -हे विद्वान महोदय, (त्वम्) आपण (अस्तात्) या लोकापैकी (या समाजात) वर्तमान सर्व मनुष्यांपैकी (अधि) वर म्हणजे श्रेष्ठ असे (जातः) प्रसिद्ध (असि) आहात. (आम्हा सामाजिकजनांची ही इच्छा आहे की आपल्याप्रमाणे) (अयम्) आपला हा पुत्र (त्वत्) आपल्या (पुनः) मागे (असौ) आपल्याप्रमाणे विशेष कीर्ती असणारा आणि (स्वाहा) सत्य कर्म करणारा व्हावा तसेच (लोकाय) हा कीर्तीमंत पुत्र दर्शन घेण्यास पात्र आणि (स्वर्गाय) विशेष सुख उपभोगण्यासाठी (जायतम्) उत्पन्न झाला आहे, (असे पुढे प्रख्यात व्हावे) ॥22॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यानो, तुम्हासाठी हे हितकर आहे की तुम्हांला या संसारात मानुषदेह मिळाला आहे म्हणून तुम्ही विद्या, सुशिल, सुस्वभाव, धर्म, योगाभ्यास आणि विज्ञान हे सर्व संपादित करावेत आणि मुक्तिसाठी यत्नशील असवो. कारण युक्ती हीच मानवजन्माची सार्थकता आहे. ॥22॥
Subject
मनुष्यांनी काय करावे, याविषयी -
Footnote
या अध्यायात व्यवहार, जीवगती, जन्म, मरण, सत्य, आशीर्वाद, अग्नी आणि सत्य-कामना आदीचे वर्णन आहे. त्यामुळे या पस्तीसाव्या अध्यायाच्या अर्थाची संगती मागील (चवतिसाव्यरा अध्यायाच्या अर्थाशी निगडीत आहे, असे जाणावे. ॥^यजुर्वेद हिन्दी भाष्याचा मराठी भाष्यानुवाद ३५ वा अध्याय समाप्त.