Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 35 / Mantra 21

22 Mantra
35/21
Devata- अग्निर्देवता Rishi- आदित्या देवा ऋषयः Chhand- निचृद्गायत्री, प्राजापत्या गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
स्यो॒ना पृ॑थिवि नो भवानृक्ष॒रा नि॒वेश॑नी।यच्छा॑ नः॒ शर्म॑ स॒प्रथाः॑। अप॑ नः॒ शोशु॑चद॒घम्॥२१॥

स्यो॒ना। पृ॒थि॒वि॒। नः॒। भ॒व॒। अ॒नृ॒क्ष॒रा। नि॒वेश॒नीति॑ नि॒ऽवेश॑नी ॥ यच्छ॑। नः॒। शर्म्म॑। स॒प्रथा॒ इति॑ स॒प्रथाः॑। अपः॑। नः॒। शो॒शु॒च॒त्। अ॒घम् ॥२१ ॥

Mantra without Swara
स्योना पृथिवि नो भवानृक्षरा निवेशनी । यच्छा नः शर्म सप्रथाः । अप नः शोशुचदघम् ॥

स्योना। पृथिवि। नः। भव। अनृक्षरा। निवेशनीति निऽवेशनी॥ यच्छ। नः। शर्म्म। सप्रथा इति सप्रथाः। अपः। नः। शोशुचत्। अघम्॥२१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (पृथिवी) हे पृथ्वीप्रमाणे क्षमाशील (गृहिणी) स्त्री, ज्याब्रमाणे (अनृक्षरा) कंटकादी रहित आणि (निवेशनी) बसण्यास वा राहण्यास उत्तम भूमी (स्योना) दु:खकारी असते, त्याप्रमाणे तू (नः) आमच्यासाठी (घरातील सर्व लहान-मोठ्यांसाठी) (शर्म) सुख व आधार (यच्छ) देणारी हो. जसे एक न्यायाधीश (नः) आमच्या (अघम्) पापवृत्तीला (अप, शोशुघतम्) शीघ्र नष्ट करतात, तशी हे गृहिणी स्त्री, आम्हा घरच्या मंडळीकडून होणार्‍या चुका वा अपराध तू दूर कर (क्षमा कर) ॥२१॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जी स्त्री पृथ्वीप्रमाणे क्षमाशील असते, क्रुरता आदी दोषांपासून दूर असते, सर्व जिची प्रशंसा करतात आणि जी इतरांचे दोषांचे निवारण करते, तीच गृहिणी असते आणि तीच सर्व गृहकार्य उत्तमपणे पार पाडते. ॥२१॥
Subject
कुलीन स्त्री कशी असते वा असावी, याविषयी -