Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 35 / Mantra 18

22 Mantra
35/18
Devata- अग्निर्देवता Rishi- दमन ऋषिः Chhand- विराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
परी॒मे गाम॑नेषत॒ पर्य॒ग्निम॑हृषत।दे॒वेष्व॑क्रत॒ श्रवः॒ कऽ इ॒माँ२ऽ आ द॑धर्षति॥१८॥

परि॑। इ॒मे। गाम्। अ॒ने॒ष॒त॒। परि॑। अ॒ग्निम्। अ॒हृ॒ष॒त॒ ॥ दे॒वेषु॑। अ॒क्र॒त॒। श्रवः॑। कः। इ॒मान्। आ। द॒ध॒र्ष॒ति॒ ॥१८ ॥

Mantra without Swara
परीमे गामनेषत पर्यग्निमहृषत । देवेष्वक्रत श्रवः क इमाँऽआ दधर्षति ॥

परि। इमे। गाम्। अनेषत। परि। अग्निम्। अहृषत॥ देवेषु। अक्रत। श्रवः। कः। इमान्। आ। दधर्षति॥१८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे राजपुरूषहो, (इमे) हे आपण हे जे (गाम्) उत्तम वाणीचा आणि या भूमीचा (परि, अनेषत) स्वीकार करीत आहात (सुरक्षेच्या आश्वासन व अभय देऊन राज्यातील जनतेले आश्‍वस्त करीत आहात) तसेच (अग्निम्) अग्नीला (परि, अहृषत) सर्व दिशांतून आणा म्हणजे त्याचा योग्य उपयोग करा. या (दवेषु) विद्वज्जनांसाठी (श्रवः) भरपूर अन्न-धान्य असेल, असे (अक्रत) करा. अशी सर्व उपकारक कार्यें करणार्‍या तुम्हांला (कः) कोण बरं (आ, दर्धषत) दटावू शकतो (वा भीती दाखवू शकतो) ॥18॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जे राजपुरुष पृथ्वीप्रमाणे धैर्य आणि सहनशक्ती धारण करतात, अग्निप्रमाणे तेजस्वी आणि अन्नाप्रमाणे आयुवर्द्धक असून धर्म-न्यायाने प्रजेचे रक्षण करतात, ते अपार राजलक्ष्मी प्राप्त करतात. ॥18॥
Subject
पुन्हा त्याच विषयी -