Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 35 / Mantra 16

22 Mantra
35/16
Devata- अग्निर्देवता Rishi- वैखानस ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
अग्न॒ऽआयू॑षि पवस॒ऽ आ सु॒वोर्ज॒मिषं॑ च नः।आ॒रे बा॑धस्व दु॒च्छुना॑म्॥१६॥

अग्ने॑। आयू॑षि। प॒व॒से॒। आ। सु॒व। ऊर्ज॑म्। इष॑म्। च॒। नः॒ ॥ आ॒रे। बा॒ध॒स्व॒। दु॒च्छुना॑म् ॥१६ ॥

Mantra without Swara
अग्नऽआयूँषि पवस्वऽआ सुवोर्जमिषञ्च नः । आरे बाधस्व दुच्छुनाम् ॥

अग्ने। आयूषि। पवसे। आ। सुव। ऊर्जम। इषम्। च। नः॥ आरे। बाधस्व। दुच्छुनाम्॥१६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) परमेश्‍वर वा हे विद्वान, आपण (आयूंषि) अन्न-धान्य आदी पदार्थ वा विशेष अवस्थेत (पवसे) आम्हांला पवित्र करणारे आहात. आपण (नः) आम्हांला (ऊर्जम्) बळ (च) आणि (इषम्) विशेष ज्ञान (आ, सुव) द्या. (उत्तमप्रकारे प्राप्त होईल, असे करा) तसेच (दुच्छुनाम्) कुत्र्यासारखे जे दुष्ट हिंसक प्राणी आहेत, त्यांना आमच्यापासून (आरे) दूर ठेवा अथवा ते जवळ आल्यास त्या प्राण्यांना (बाधस्व) ताडना करा (आम्हाला पुष्कळ धन-धान्य द्या आणि सर्वथा निर्भय असू द्या ॥16॥
Essence
भावार्थ - जे मनुष्य दुराचाराचा त्याग करून आणि दुराचारी लोकांच्या संगतीपासून दूर राहून परमेश्‍वराची उपासना व सत्यवादी विद्वानांची सेवा करतात, ते धनधान्याने समृद्ध होऊन दीर्घायू होतात. ॥16॥
Subject
कोण लोक दीर्घायू होतात, याविषयी -