Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 35 / Mantra 15

22 Mantra
35/15
Devata- अग्निर्देवता Rishi- आदित्या देवा ऋषयः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
इ॒मं जी॒वेभ्यः॑ परि॒धिं द॑धामि॒ मैषां॒ नु गा॒दप॑रो॒ऽअर्थ॑मे॒तम्।श॒तं जी॑वन्तु श॒रदः॑ पुरू॒चीर॒न्तर्मृ॒त्युं द॑धतां॒ पर्व॑तेन॥१५॥

इ॒मम्। जी॒वेभ्यः॑। प॒रि॒धिमिति॑ परि॒ऽधिम्। द॒धा॒मि॒। मा। ए॒षा॒म्। नु। गा॒त्। अप॑रः। अर्थ॑म्। ए॒तम् ॥ श॒तम्। जी॒व॒न्तु॒। श॒रदः॑। पु॒रू॒चीः। अ॒न्तः। मृ॒त्युम्। द॒ध॒ता॒म्। पर्व॑तेन ॥१५ ॥

Mantra without Swara
इमञ्जीवेभ्यः परिधिन्दधामि मैषान्नु गादपरो अर्थमेतम् । शतथ्जीवन्तु शरदः पुरूचीरन्तर्मृत्युन्दधताम्पर्वतेन् ॥

इमम्। जीवेभ्यः। परिधिमिति परिऽधिम्। दधामि। मा। एषाम्। नु। गात्। अपरः। अर्थम्। एतम्॥ शतम्। जीवन्तु। शरदः। पुरूचीः। अन्तः। मृत्युम्। दधताम्। पर्वतेन॥१५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (परमेश्‍वर उपदेश करीत आहे आणि उपासकांना अभय देत आहे. परमेश्‍वर म्हणतो) मी परमेश्‍वर (उपासकांना अभय देत सांगत आहे की) (एषाम्) या जीवांनी (एतम्) पुरुषार्थ आणि सत्याचरणाद्वारे अर्जित (द्रव्यम्) धनाचे (अपरः) अन्य कोणी (मा) (नु) (गात्) अपहार वा नाश करण्यात यशस्वी होऊ नये (वा होणार नाही) अशाप्रकारे (इमम्) या (जीवेभ्यः) प्राण्यांसाठी मी (परिधिम्) मर्यादा (अथवा जीवनावधी) (दधामि) घालून देत आहे (तुमच्यापैकी कोणीही अल्पायू होऊ नये, तुम्ही पूर्ण आयुष्य उपभोगाने, अशी व्यवस्था करीत आहे) अशाप्रकारे सदाचरण करीत तुम्ही सर्वजण (पुरूचीः) अनेक वर्षापर्यंत वा (शतम्) (शरदः) शंभर ऋतूपर्यंत (जीवन्तु) जीवित रहा आणि (पर्वतेम) ज्ञानरूप वा ब्रह्मचर्यरूप पर्वताने (मृत्युम्) तुम्ही मृत्यूला (आन्तः) (दधताम्) दाबून टाका वा दूर ठेवा. ॥15॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, जे मनुष्य परमेश्‍वराने निश्‍चित केलेल्या धर्माचे आचरण करतात आणि अधर्माचा त्याग करतात, ईश्‍वराने ठरविलेल्या मर्यादेचे उल्लंघन करीत नाहीत, इतरांचे पदार्थ हिसकावून घेत नाहीत, ते लोक अवश्यमेव शंभरवर्ष जिवंत राहू शकतात. तसेच जे ईश्‍वराज्ञेच्या विरुद्ध न जाता पूर्ण ब्रह्मचर्य धारण करून. विद्या प्राप्त करीत धर्माप्रमाणे आचरण करतात, त्यांना मृत्यू अवेळी येऊन अडवू शकत नाही. (वा त्यांना अवेळी मरण येत नाही) ॥15॥
Subject
पुन्हा तोच विषय -