Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 35 / Mantra 13

22 Mantra
35/13
Devata- सूर्य्यो देवता Rishi- आदित्या देवा ऋषयः Chhand- स्वराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
अ॒न॒ड्वाह॑म॒न्वार॑भामहे॒ सौर॑भेयꣳ स्व॒स्तये॑।स न॒ऽइन्द्र॑ऽइव दे॒वेभ्यो॒ वह्निः॑ स॒न्तर॑णो भव॥१३॥

अ॒न॒ड्वाह॑म्। अ॒न्वार॑भामह॒ऽइत्य॑नु॒ऽआर॑भामहे। सौर॑भेयम्। स्व॒स्तये॑ ॥ सः। नः॒। इन्द्र॑ऽइ॒वेतीन्द्र॑ इव। दे॒वेभ्यः॑। वह्निः॑। स॒न्तर॑ण॒ इति॑ स॒म्ऽतर॑णः। भ॒व॒ ॥१३ ॥

Mantra without Swara
अनड्वाहमन्वारभामहे सौरभेयँ स्वस्तये । स नऽइन्द्रऽइव देवेभ्यो वह्निः सन्तरणो भव ॥

अनड्वाहम्। अन्वारभामहऽइत्यनुऽआरभामहे। सौरभेयम्। स्वस्तये॥ सः। नः। इन्द्रऽइवेतीन्द्र इव। देवेभ्यः। वह्निः। सन्तरण इति सम्ऽतरणः। भव॥१३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान, जो (वह्निः) लक्ष्याकडे लवकर नेणारा अग्नी (नः) आम्हा विद्वानांना (सन्तरणः) सुगम मार्गाने पार नेणारा आहे, आणि (सौरभेयम्) सुरानाम गायीच्या वासराप्रमाणे म्हणजे (अनड्वाहम्) गाडी ओढणार्‍या बैलाप्रमाणे आम्ही विद्वान (वैज्ञानिक जन) (स्वहस्ते) कल्याण व सुखासाठी (अन्वारभामहे) त्या अग्नीद्वारे यान आदीचे निर्माण करून त्यातून प्राण्यांना इकडून तिकडे नेतो (सः) तो अग्नी तुमच्यासाठी (सर्व मानवासाठी) (इन्द्र इव) वीज जशी सर्वांसाठी सुखकारिणी तशाप्रकारे तो अग्नी तुमच्यासाठी (मानवमात्रासाठी) कल्याणकारी (भव) व्हावा. ॥13॥
Essence
भावार्थ - जे लोक विद्युतरूप अग्नीविद्येपासून यान-निर्मिती आदी कार्य सिद्ध करण्यासाठी यत्न करतात, ते लोक अतिबलशाली बैलाप्रमाणे सर्व कार्ये पूर्ण करण्यात यशस्वी होतात आणि विद्युत जशी त्वरित इकडून तिकडे जाते, तद्वत ते वैज्ञानिक लोक शीघ्र आवागमन करण्यात यशस्वी होतात. ॥13॥
Subject
कोण लोक कार्य सिद्ध करू शकतात, याविषयी -