Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 35 / Mantra 11

22 Mantra
35/11
Devata- आपो देवताः Rishi- आदित्या देवा ऋषयः Chhand- विराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
अपा॒घमप॒ किल्वि॑ष॒मप॑ कृ॒त्यामपो॒ रपः॑।अपा॑मार्ग॒ त्वम॒स्मदप॑ दुः॒ष्वप्न्य॑ꣳ सुव॥११॥

अप॑। अ॒घम्। अप॑। किल्वि॑षम्। अप॑। कृ॒त्याम्। अपो॒ऽइत्यपोः॑। रपः॑ ॥ अपा॑मार्ग। अप॑मा॒र्गेत्यप॑ऽमार्ग। त्वम्। अ॒स्मत्। अप॑। दुः॒ष्वप्न्य॑म्। दुः॒ष्वप्न्य॒मिति॑ दुः॒ऽस्वप्न्य॑म्। सु॒व॒ ॥११ ॥

Mantra without Swara
अपाघमप किल्विषमप कृत्यामपो रपः । अपामार्ग त्वमस्मदप दुःष्वप्न्यँ सुव ॥

अप। अघम्। अप। किल्विषम्। अप। कृत्याम्। अपोऽइत्यपोः। रपः॥ अपामार्ग। अपमार्गेत्यपऽमार्ग। त्वम्। अस्मत्। अप। दुःष्वप्न्यम्। दुःष्वप्न्यमिति दुःऽस्वप्न्यम्। सुव॥११॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (अपामार्ग) अपामार्ग औषधीप्रमाणे जशी रोग दूर करते, तसे हे पापांना दूर वा नष्ट करणारे हे विद्वान महोदय, (अथवा हे पापनिवारक परमेश्‍वर) (त्वम्) आपण (अस्यम्) आमच्यापासून (अपम्) पापा (अप, सुव) दूर ठेवा (वा आमच्यातील पापभावना नष्ट करा) तसेच आमच्यातील (किल्मीषम्) मनाचे मालिन्य आणि (कृत्यम्) दुष्ट कर्म वा दुष्प्रवृत्ती (अप) दूर करा. (रपः) आमच्या बाह्येंद्रियातील चांचल्य रूप अपराध (अपो) दूर करा आणि (दुःस्वप्नम्) निद्रावस्थेतदेखील मनात येणार्‍या दुर्विचारांना (अप) दूर करा. ॥11॥
Essence
भावार्थ -या मंत्रात उपमा अलंकार आहे. जसे अपामार्ग आदी औषधी रोग-निवारण करतात आणि प्राण्यांना सुखी करतात, तद्वत जे लोक स्वतः पापापासून दूर राहून पवित्र असतात आणि इतरांनाही त्यांच्यातील दोष नष्ट करून पवित्र करतात, ते लोक मनुष्याना पवित्र राहण्यास सहायक होतात. ॥11॥
Subject
कोण माणसें इतरांना पवित्र करतात, याविषयी -