Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 35 / Mantra 10

22 Mantra
35/10
Devata- आपो देवताः Rishi- शुनःशेप ऋषिः Chhand- निचृत् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अश्म॑न्वती रीयते॒ सꣳर॑भध्व॒मुत्ति॑ष्ठत॒ प्र त॑रता सखायः।अत्रा॑ जही॒मोऽशि॑वा॒ येऽ अस॑ञ्छि॒वान्व॒यमुत्त॑रेमा॒भि वाजा॑न्॥१०॥

अश्म॑न्व॒तीत्यश्म॑न्ऽवती। री॒य॒ते॒। सम्। र॒भ॒ध्व॒म्। उत्। ति॒ष्ठ॒त॒। प्र। त॒र॒त॒। स॒खा॒यः॒ ॥अत्र॑। ज॒ही॒मः॒। अशि॑वाः। ये। अस॑न्। शि॒वान्। व॒यम्। उत्। त॒रे॒म॒। अ॒भि। वाजा॑न् ॥१० ॥

Mantra without Swara
अश्मन्वती रीयते सँ रभध्वमुत्तिष्ठत प्र तरता सखायः । अत्र जहीमो शिवा येऽअसञ्छिवान्वयमुत्तरेमाभि वाजान् ॥

अश्मन्वतीत्यश्मन्ऽवती। रीयते। सम्। रभध्वम्। उत्। तिष्ठत। प्र। तरत। सखायः॥अत्र। जहीमः। अशिवाः। ये। असन्। शिवान्। वयम्। उत्। तरेम। अभि। वाजान्॥१०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (सज्जन लोक सामान्यजनांना) हे (सखायः) मित्रहो, (अश्मन्वती) जसा मेघाने भरलेला आकाश अथवा दगड-धोंडयाने भरलेली नदीतील प्रवाह (रीयते) (दगडांची पर्वा न करता पुढे पुढे) वाहत जातो, तसे (वयम्) आम्ही सत्प्रवृत्त सज्जन (अत्र) या जगात वा यासमयीं (ये) जे जे (अशिवाः) अमंगलकारी (वा आमच्या मार्गात आड येणार्‍या विघ्न-बाधां (असन्) आहेत, आम्ही त्यांना (जहीमः) दूर सारतो आणि (शिवान्) सुखकारी (वाजान्) अत्युत्तम धन-संपदा व अन्नधान्य (अभि, उत्, तरेम) सर्वतः सर्वथा प्राप्त करतो अर्थात त्याचा उपभोग घेत आहोत वा घेतला आहे, तुम्ही सर्वजणदेखील (संभरध्वम्) चांगल्याप्रकारे तसा आरंभ करा (अत्तिष्ठत) (आलस्य व नैराश्य सोडून) उठा, जागे व्हा, प्राप्त करा आणि (प्रतरत) अशा रीतीने दुःखांना उल्लंघून पलीकडे (यशाकडे) जा. ॥10॥
Essence
भावार्थ - ज्याप्रमाणे एका विशाल नौकाद्वारे समुद्र पार करता येतो, त्याप्रमाणे जे लोक अशुभ आचरण सोडून दुष्टांना नष्ट वा दूर करतात आणि प्रयत्न व उद्यम करीत मंगल-आचरण करतात, ते सहजच दुःखसागर तरून जाऊ शकतात. ॥10॥
Subject
कोण दुःखसागराला तरून जाऊ शकतात, याविषयी -