Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 34 / Mantra 6

58 Mantra
34/6
Devata- मनो देवता Rishi- शिवसङ्कल्प ऋषिः Chhand- स्वराट् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
सु॒षा॒र॒थिरश्वा॑निव॒ यन्म॑नु॒ष्यान्ने॑नी॒यते॒ऽभीशु॑भिर्वा॒जिन॑ऽइव।हृ॒त्प्रति॑ष्ठं॒ यद॑जि॒रं जवि॑ष्ठं॒ तन्मे॒ मनः॑ शि॒वस॑ङ्कल्पमस्तु॥६॥

सु॒षा॒र॒थिः। सु॒सा॒र॒थिरिति॑ सुऽसार॒थिः। अश्वा॑नि॒वेत्यश्वा॑न्ऽइव। यत्। म॒नु॒ष्या᳖न्। ने॒नी॒यते॑। अ॒भीशु॑भि॒रित्य॒भीशु॑ऽभिः। वा॒जिन॑ऽइ॒वेति॑ वा॒जिनः॑ऽइव ॥ हृ॒त्प्रति॑ष्ठम्। हृ॒त्प्रतिस्थ॒मिति॑ हृ॒त्ऽप्रति॑स्थम्। यत्। अ॒जि॒रम्। जवि॑ष्ठम्। तत्। मे॒। मनः॑। शि॒वस॑ङ्कल्प॒मिति॑ शि॒वऽस॑ङ्कल्पम्। अ॒स्तु॒ ॥६ ॥

Mantra without Swara
सुषारथिरश्वानिव यन्मनुष्यान्नेनीयतेऽभीशुभिर्वाजिनऽइव। हृत्प्रतिष्ठँयदजिरञ्जविष्ठन्तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु ॥

सुषारथिः। सुसारथिरिति सुऽसारथिः। अश्वानिवेत्यश्वान्ऽइव। यत्। मनुष्यान्। नेनीयते। अभीशुभिरित्यभीशुऽभिः। वाजिनऽइवेति वाजिनःऽइव॥ हृत्प्रतिष्ठम्। हृत्प्रतिस्थमिति हृत्ऽप्रतिस्थम्। यत्। अजिरम्। जविष्ठम्। तत्। मे। मनः। शिवसङ्कल्पमिति शिवऽसङ्कल्पम्। अस्तु॥६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (सुषारथिः) एक कुशल सारती (रथचालक) ज्याप्रमाणे (अश्‍वानिव) लगामाद्वारे घोड्यांना व्यवस्थितपणे चालवितो, त्याप्रमाणे (यत्) जे मन (मनुष्यान्) मनुष्य आदी प्राण्यांना (नेनीयते) इकडे-तिकडे नेतो (वा योग्य दिशेकडे चालवितो) आणि जसा तो सारथी (अभीशुभिः) दोरी, लगाम आदी साधनांद्वारे (वाजिनः) वेगवान घोड्यावरही नियंत्रण ठेवतो, तसेच (र्‍यत्) जे मन (हृत्प्रतिष्ठम्) हृदयात स्थित त्या (अजिरम्) विषयांकडे प्रेरित करणारे अथवा ज्याला म्हातारपण कधी येत नाही, आणि जे (जविष्ठम्) अत्यंत वेगवान आहे, (तत्) ते (मे) माझे मन (शिवसंकल्पम्) मंगलकारी नियमात राहणारे (अस्तु) असावे. ॥6॥
Essence
भावार्थ - या मंत्रात दोन उपमा अलंकार आहेत. (‘सुषारथिः अश्‍वानिव’ आणि ‘अभीशुभिर्वाजिन इव’) ज्या प्रमाणे एक सारथी घोड्यांना वश करून हवे तिकडे घेऊन जातो तद्वत जे मन आसक्तिमय पदार्थाकडे बलेन घेऊन जातो. सर्व मूर्ख माणसें मनाच्या म्हणण्याप्रमाणे वागतात आणि बूद्धिमान माणसे मात्र त्याला आपल्या वश करतात. मन शुद्ध असल्यास ते सुखकारी असते आणि अशुद्ध असल्यास दुःखदायी होते. मनाला जिंकले तर इच्छित सिद्धी प्रपात होते आणि न जिंकले तर इच्छित ध्येय प्राप्त होत नाही. यामुळे सर्व मनुष्यांनी मनाला आपले वशीभूत केले पाहिजे. ॥6॥
Subject
पुन्हा, तोच विषय -