Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 34 / Mantra 55

58 Mantra
34/55
Devata- अध्यात्मं प्राणा देवताः Rishi- कण्व ऋषिः Chhand- भुरिग् जगती Swara- निषादः
Mantra with Swara
स॒प्तऽऋष॑यः॒ प्रति॑हिताः॒ शरी॑रे स॒प्त र॑क्षन्ति॒ सद॒मप्र॑मादम्।स॒प्तापः॒ स्वप॑तो लो॒कमी॑यु॒स्तत्र॑ जागृतो॒ऽअस्व॑प्नजौ सत्र॒सदौ॑ च दे॒वौ॥५५॥

स॒प्त। ऋष॑यः। प्रति॑हिता॒ इति॒ प्रति॑ऽहिताः। शरी॑रे। स॒प्त। र॒क्ष॒न्ति॒। सद॑म्। अप्र॑माद॒मित्य॑प्रऽमादम् ॥ स॒प्त। आपः॑। स्वप॑तः। लो॒कम्। ई॒युः॒। तत्र॑। जा॒गृ॒तः॒। अस्व॑प्नजा॒वित्यस्व॑प्नऽजौ। स॒त्र॒सदा॒विति॑ स॒त्र॒ऽसदौ॑। च॒। दे॒वौ ॥५५ ॥

Mantra without Swara
सप्तऽऋषयः प्रतिहिताः शरीरे सप्त रक्षन्ति सदमप्रमादम् । सप्तापः स्वपतो लोकमीयुस्तत्र जागृतोऽअस्वप्नजौ सत्रसदौ च देवौ ॥

सप्त। ऋषयः। प्रतिहिता इति प्रतिऽहिताः। शरीरे। सप्त। रक्षन्ति। सदम्। अप्रमादमित्यप्रऽमादम्॥ सप्त। आपः। स्वपतः। लोकम्। ईयुः। तत्र। जागृतः। अस्वप्नजावित्यस्वप्नऽजौ। सत्रसदाविति सत्रऽसदौ। च। देवौ॥५५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (सप्त, ऋषयः) सातऋषी म्हणजे विषयांना शब्द, रूप, गंध आदींना ग्रहण करणार्‍या पाच ज्ञानेंद्रियें आणि मन व बुद्धी, हे सात ऋषी या (शरीरे) शरीरात (प्रतिहिताः) पूर्ण विश्‍वासाने, दृढतेने स्थित आहेत. हेच (सप्त) सात ऋषी (अप्रमादम्) यत्किचिंत प्रमाद वा चूक न करता (सदम्) शरीरातील आपल्या स्थानात राहून शरीराची (रक्षन्ति) रक्षा करतात. तसेच हे ऋषी (स्वपतः) झोपलेल्या मनुष्याच्या (आपः) शरीरालादेखील व्याप्त करून (लोकम्) जीवात्म्याला (ईयूः) प्राप्त करतात (तत्र) त्या स्थितीत (म्हणजे जेव्हा सातऋषी आत्म्यास्थित असतात, त्यावेळी) (अस्वप्नजौ) ज्यांना कधी स्वप्नावस्था येत नाहीत (जे कधी झोपत नाहीत) आणि जे सदा (सत्रसदौ) जीवात्म्याची रक्षा करतात (च) आणि जे (दैवौ) उत्तमगुण धारण करतात ते प्राण व अपान शरीरात (जागृतः) जागृत असतात (प्राण-अपान कधी झोपत नाहीत) ॥55॥
Essence
भावार्थ -या शरीरात स्थिर आणि व्यापक विषयांना जाणणारे अंतःकरण आणि पंचज्ञानेंद्रियें या शरिराची निरंतर रक्षा करतात. जेव्हां जीवात्मा झोपलेला असतो, तेंव्हां त्याला तमोगुणाच्या बळावर हे आंत स्थिर असतात, पण बाह्य विषयांचे ज्ञान करवीत नाहीत आणि स्वप्नावस्थेत हे सात इंद्रियादी गण जीवात्म्याचे रक्षण करीत तमोगुणाद्वारे आवृत होत नाहीत. त्यावेळी प्राण आणि अपान हे जगतात, जर प्राण आणि अपान देखील झोपी जातील, तर शरीराचे मरण निश्‍चित जाणावे. ॥55॥
Subject
आता शरीर आणि इंद्रिये, याविषयी -