Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 34 / Mantra 47

58 Mantra
34/47
Devata- अश्विनौ देवते Rishi- हिरण्यस्तूप ऋषिः Chhand- जगती Swara- निषादः
Mantra with Swara
आ ना॑सत्या त्रि॒भिरे॑काद॒शैरि॒ह दे॒वेभि॑र्यातं मधु॒पेय॑मश्विना।प्रायु॒स्तारि॑ष्टं॒ नी रपा॑सि मृक्षत॒ꣳ सेध॑तं॒ द्वेषो॒ भव॑तꣳ सचा॒भुवा॑॥४७॥

आ। ना॒स॒त्या॒। त्रि॒भिरिति॑ त्रि॒ऽभिः। ए॒का॒द॒शैः। इ॒ह। दे॒वेभिः॑। या॒त॒म्। म॒धु॒पेय॒मिति॑ मधु॒पेऽय॑म्। अ॒श्वि॒ना॒ ॥ प्र। आयुः॑। तारि॑ष्टम्। निः। रपा॑सि। मृ॒क्ष॒त॒म्। सेध॑तम्। द्वेषः॑। भव॑तम्। स॒चा॒भुवेति॑ सचा॒ऽभुवा॑ ॥४७ ॥

Mantra without Swara
आ नासत्या त्रिभिरेकादशैरिह देवेभिर्यातम्मधुपेयमश्विना । प्रायुस्तारिष्टन्नी रपाँसि मृक्षतँ सेधतन्द्वेषो भवतँ सचाभुवा ॥

आ। नासत्या। त्रिभिरिति त्रिऽभिः। एकादशैः। इह। देवेभिः। यातम्। मधुपेयमिति मधुपेऽयम्। अश्विना॥ प्र। आयुः। तारिष्टम्। निः। रपासि। मृक्षतम्। सेधतम्। द्वेषः। भवतम्। सचाभुवेति सचाऽभुवा॥४७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (नासत्या) असत्याचरणापासून सदा दूर असणारे (अश्‍विना) राजा आणि प्रजेतील विद्वज्जनहो, तुम्ही (इह) या जगात (त्रिभिः) (एकादशैः) तीनx अकरा म्हणजे तेहतीस (देवेभिः) उत्तम पृथ्वी आदी (आठ वसु, प्राणआदी अकरा रूद्र, बारा महिने, विद्युत आणि यज्ञ असे एकूण) तेहतीस देवतांसह ( मधुपेयम्) उपकारक योग्य औषधीचा रस (आ, यातम्) पिण्यासाठी तुम्ही राजा व प्रजाजन इथे प्रेमाने या. (रपांसि) आमच्यातील पापभावना (मृक्षतम्) नष्ट करून आमचे चित्त शुद्ध करा. (द्वेषः) द्वेष आदी दुर्गुण तसेच दोषपूर्ण प्राण्यांना (निःषेधतम्) आमच्यापासून दूर ठेवा आणि (सचाभुवा) सत्य आणि पुरुषार्थाच्या कामांमधे आम्हांला (भवतम्) सहायक व्हा. आमचे (आयुः) आयुष्य (प्र, तारिष्टम्) वाढवा. तुमच्याप्रमाणे आम्हीदेखील सदाचारी आणि सत्प्रवृत्त होऊ, असे करा. ॥47॥
Essence
भावार्थ - तेच लोक या जगाचे हित करणारे असतात की जे पृथ्वी आदींची सृष्टिविद्या अवगत करून इतरांनाही ती विद्या शिकवितात. इतरांच्या जीवनातील दोष नष्ट करून दीर्घायू होण्याकरिता प्रचार व मार्गदर्शन करतात, तेच खरे हितैषी असतात. ॥।47॥
Subject
कोण माणसे जगाचे हित करणारी असतात, याविषयी -