Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 34 / Mantra 44

58 Mantra
34/44
Devata- विष्णुर्देवता Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
तद्विप्रा॑सो विप॒न्यवो॑ जागृ॒वासः॒ समि॑न्धते।विष्णो॒र्यत्प॑र॒मं प॒दम्॥४४॥

तत्। विप्रा॑सः। वि॒प॒न्यवः॑। जा॒गृ॒वास॒ इति॑ जागृ॒वासः॑। सम्। इ॒न्ध॒ते॒ ॥ विष्णोः॑। यत्। प॒र॒मम्। प॒दम् ॥४४ ॥

Mantra without Swara
तद्विप्रासो विपन्यवो जागृवाँसः समिन्धते । विष्णोर्यत्परमम्पदम् ॥

तत्। विप्रासः। विपन्यवः। जागृवास इति जागृवासः। सम्। इन्धते॥ विष्णोः। यत्। परमम्। पदम्॥४४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, (जागृवांसः) अविद्यारूप निद्रेपासून जागृत वा चैतन्य झालेले तसेच (विपन्यवः) विशेत्वाने स्तुत्य आणि ईश्‍वराची स्तुती, उपासना करणारे जे (विप्रासः) बुद्धिमान योगी लोक (विष्णोः) सर्वत्र व्यापक परमेश्‍वराचे (यत्) जे (पदम्) प्राप्तव्य व योग्य असे मोक्षस्वरूप आहे, (तत्) त्या स्वरूपाला जे बुद्धिमान विद्वान (सम्, इन्धते) सम्यकरूपेण प्रकाशित करतात, आम्हाला सांगतात (हे मनुष्यानो, आमच्याप्रमाणे) त्यांच्या सत्संगात राहून तुम्हीही तसेच व्हा. ॥44॥
Essence
भावार्थ - योगाभ्यास आदी सत्कर्माद्वारे मन, आणि आत्मा शुद्ध करून घेतलेले जे धार्मिक पुरुषार्थी लोक आहेत, तेच ईश्‍वराचे स्वरूप जाणण्यास आणि त्याला प्राप्त करण्यात यशस्वी होतात, याहून वेगळे लोक कदापि जाणू शकत नाही. ॥44॥
Subject
पुन्हा त्याच विषयी -