Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 34 / Mantra 43

58 Mantra
34/43
Devata- विष्णुर्देवता Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- निचृद् गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
त्रीणि॑ प॒दा विच॑क्रमे॒ विष्णु॑र्गो॒पाऽअदा॑भ्यः।अतो॒ धर्मा॑णि धा॒रय॑न्॥४३॥

त्रीणि॑। प॒दा। वि। च॒क्र॒मे॒। विष्णुः॑। गो॒पाः। अदा॑भ्यः ॥ अतः॑। धर्मा॑णि। धा॒रय॑न् ॥४३ ॥

Mantra without Swara
त्रीणि पदा वि चक्रमे विष्णुर्गोपाऽअदाभ्यः । अतो धर्माणि धारयन् ॥

त्रीणि। पदा। वि। चक्रमे। विष्णुः। गोपाः। अदाभ्यः॥ अतः। धर्माणि। धारयन॥४३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, जो परमेश्‍वर (अदाभ्यः) हिंसाविरहित असून दयाळू आहे, जो (गोपा) रक्षक आहे, सा तो (विष्णुः) चराचर जगात व्याप्त परमेश्‍वर (धर्माणि) पुण्यरूप कर्म करण्यासाठी मनुष्यांना प्रेरणा देणारा तसेच पृथिवी आदी ग्रहांना (धारयन्) धारण करणारा आहे. त्यामुळे तो (त्रीणि) तीन (पदा) ज्ञातव्य वा प्राप्तव्य कारण म्हणजे सूक्ष्मरूप व स्थूलरूप जगावर (वि, चक्रमे) राज्य वा अधिकार करीत आहे. तोच आम्हाला पूजनीय आहे. ॥43॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, ज्या परमेश्‍वराने या भूमी, अंतरिक्ष आणि सूर्य, या तीन प्रकारच्या जगाची रचना केली आहे, जो सर्वांना धारण करीत आहे (त्याने धारण केल्यामुळेच पृथ्वी, सूर्य आदी ग्रह-नक्षत्र आपापल्या कक्षेत नियमाने भ्रमण करीत आहेत) तोच या जगाचे रक्षण करीत आहे. असा तोच परमेश्‍वर सर्वांचा इष्टदेव व उपासनीय स्वामी आहे. ॥43॥
Subject
पुढील मंत्रात ईश्‍वराविषयी -