Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 34 / Mantra 4

58 Mantra
34/4
Devata- मनो देवता Rishi- शिवसङ्कल्प ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
येने॒दं भू॒तं भुव॑नं भवि॒ष्यत् परि॑गृहीतम॒मृते॑न॒ सर्व॑म्।येन॑ य॒ज्ञस्ता॒यते॑ स॒प्तहो॑ता॒ तन्मे॒ मनः॑ शि॒वस॑ङ्कल्पमस्तु॥४॥

येन॑। इ॒दम्। भू॒तम्। भुव॑नम्। भ॒वि॒ष्यत्। परि॑गृहीत॒मिति॑ परि॑ऽगृहीतम्। अ॒मृते॑न। सर्व॑म् ॥ येन॑। य॒ज्ञः। ता॒यते॑। स॒प्तहो॒तेति॑ स॒प्तऽहो॒ता। तत्। मे॒। मनः॑। शि॒वस॑ङ्कल्प॒मिति॑ शि॒वऽस॑ङ्कल्पम्। अ॒स्तु॒ ॥४ ॥

Mantra without Swara
येनेदम्भूतम्भुवनम्भविष्यत्परिगृहीतममृतेन सर्वम्। येन यज्ञस्तायते सप्तहोता तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु॥

येन। इदम्। भूतम्। भुवनम्। भविष्यत्। परिगृहीतमिति परिऽगृहीतम्। अमृतेन। सर्वम्॥ येन। यज्ञः। तायते। सप्तहोतेति सप्तऽहोता। तत्। मे। मनः। शिवसङ्कल्पमिति शिवऽसङ्कल्पम्। अस्तु॥४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, (येन) ज्या (अमृतेन) अविनाशी परमात्म्याचा साथी असलेल्या मनाने (भूतम्) झालेले (भुवनम्) वर्तमानात असलेले आणि (भविष्यत्) पुढील काळात होणारे (सर्वम्), इदम्) या सर्व त्रिकालस्थ वस्तू (परिगृहीतम्) सर्वतः गृहीत होतात म्हणजे जाणल्या जातात (ते माझे मन शिवसंकल्पमय व्हावे) तसेच (येन) ज्या मनाद्वारे (सप्तहोता) सात मनुष्य अथवा पाच प्राण, सहावा जीवात्मा आणि अव्यक्त हा सातवा, हे सात देणारे, घेणारे ज्यामधे आहेत, आणि (यज्ञः) अग्निष्टोम आदी कार्यें अथवा विज्ञानरूप व्यवहार (तायते) विस्तारित केले जातात (तत्)ते (मे) माझे (मनः) योगयुक्त मन (शिवसंकल्पम्) मोक्षरूप संकल्प करणारे (अस्तु) व्हावे ॥4॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यानो, जे मन योगाभ्यासाच्या साधनांनी आणि उपसाधनांनी प्राप्त होणारे असून भूत, वर्तमान, भविष्य या तीन्ही काळांचा ज्ञाता आहे, सर्व सृष्टीला जाणणारे (म्हणजे जाणण्याचे साधन) असून कर्म, उपासना व ज्ञानाचा साधक आहे, तुम्ही त्या मनाला सदा कल्याणात रममाण करा. ॥4॥
Subject
पुनश्‍च, तोच विषय -