Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 34 / Mantra 39

58 Mantra
34/39
Devata- भगो देवता Rishi- वसिष्ठ ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
सम॑ध्व॒रायो॒षसो॑ नमन्त दधि॒क्रावे॑व॒ शुच॑ये प॒दाय॑।अ॒र्वा॒ची॒नं व॑सु॒विदं॒ भगं॑ नो॒ रथ॑मि॒वाश्वा॑ वा॒जिन॒ऽआ व॑हन्तु॥३९॥

सम्। अ॒ध्व॒राय॑। उ॒षसः॑। न॒म॒न्त॒। द॒धि॒क्रावे॒वेति॑ दधि॒ऽक्रावा॑ऽइव। शुच॑ये। प॒दाय॑ ॥ अ॒र्वा॒ची॒नम्। व॒सु॒विद॒मिति॑ वसु॒ऽविद॑म्। भग॑म्। नः॒। रथ॑मि॒वेति॒ रथ॑म्ऽइव। अश्वाः॑। वाजिनः॑। आ। व॒ह॒न्तु॒ ॥३९ ॥

Mantra without Swara
समध्वरायोषसो नमन्त दधिक्रावेव शुचये पदाय । अर्वाचीनँवसुविदम्भगन्नो रथमिवाश्वा वाजिनऽआ वहन्तु ॥

सम्। अध्वराय। उषसः। नमन्त। दधिक्रावेवेति दधिऽक्रावाऽइव। शुचये। पदाय॥ अर्वाचीनम्। वसुविदमिति वसुऽविदम्। भगम्। नः। रथमिवेति रथम्ऽइव। अश्वाः। वाजिनः। आ। वहन्तु॥३९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, (उषसः) प्रभातकाळी जसा एक (दधिक्रावेव) चांगला प्रशिक्षित घोडा (कार्यासाठी हुशार असतो) तसे तुम्ही (शुचये (पदाय) पवित्र पद वा स्तर प्राप्त करण्यासाठी (अध्वराय) अहिंसामय कर्म करण्यासाठी (सम्, नमन्त) सम्यक प्रकारे नम्र वा तत्पर व्हा. अर्थात जसे प्रातःसमयीं सत्वगुणाचे प्राध्यान्य असल्यामुळे सर्व प्राणी नम्र वा शुद्धचित्त असतात, तसे तुम्ही व्हा. तसेच ज्याप्रमाणे (अश्‍वाः) शीघ्रगामी (वाजिनः) घोडे (रथमिद) सुंदर रथाला ओढतात (व योग्य दिशेने नेतात) त्याप्रमाणे (नः) आम्हाला (अर्वाचीनम्) या काळातील (वसुविदम्) धनवान लोकांनी धनप्राप्तीसाठी (भगम्) ऐश्‍वर्य प्राप्त करून द्यावे (आम्हालाही धनप्राप्तीसाठी मार्गदर्शन करावे) त्या प्रमाणे हे धनवान, आपणही आम्हाला (आ, वहन्तु) धनप्राप्तीसाठी त्या दिशेने न्यावे, (अशी आम्ही प्रार्थना करतो) ॥39॥
Essence
भावार्थ - या मंत्रात दोन उपमा अलंकार आहेत. (1. दधिक्रावेव 2. रथमिवाश्‍वाः) प्रभातसमयी प्रभातकाळी जशी ती वेळ दिशांना प्रकाशित करते. तद्वत जे लोक जगात विद्या आणि धर्माचा प्रकाश करतात, त्यांना पवित्र विद्वान जाणावे. तसेच ज्याप्रमाणे घोडे यानाला योग्य स्थानी नेतात. तद्वत जे लोक शीघ्र समग्र ऐश्‍वर्य प्राप्त करवितात, त्यांना पवित्र विद्वान मानावे. ॥39॥
Subject
पुनश्‍च, तोच विषय -