Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 34 / Mantra 31

58 Mantra
34/31
Devata- सूर्य्यो देवता Rishi- हिरण्यस्तूप ऋषिः Chhand- विराट् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
आ कृ॒ष्णेन॒ रज॑सा॒ वर्त्त॑मानो निवे॒शय॑न्न॒मृतं॒ मर्त्यं॑ च।हि॒र॒ण्यये॑न सवि॒ता रथे॒ना दे॒वो या॑ति॒ भुव॑नानि॒ पश्य॑न्॥३१॥

आ। कृ॒ष्णेन॑। रज॑सा। वर्त्त॑मानः। नि॒वे॒शय॒न्निति॑ निऽवे॒शय॑न्। अ॒मृत॑म्। मर्त्य॑म्। च॒ ॥ हि॒र॒ण्यये॑न। स॒वि॒ता। रथे॑न। आ। दे॒वः। या॒ति॒। भुव॑नानि। पश्य॑न् ॥३१ ॥

Mantra without Swara
आ कृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन्नमृतम्मर्त्यञ्च । हिरण्ययेन सविता रथेना देवो याति भुवनानि पश्यन् ॥

आ। कृष्णेन। रजसा। वर्त्तमानः। निवेशयन्निति निऽवेशयन्। अमृतम्। मर्त्यम्। च॥ हिरण्ययेन। सविता। रथेन। आ। देवः। याति। भुवनानि। पश्यन्॥३१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान (वैज्ञानिक) महोदय, जो (देवः) देदीप्यमान विद्युतरूप अग्नी (आ, खृष्णेन) आकर्षित (रजसा) लोक समूहासह (ग्रह-नक्षत्रादी ज्या आकर्षणशक्तीने विद्यमान आहेत, ती विद्युतअग्नी. सर्वांना एकत्रित ठेवतो) तो अग्नी (वर्तमानः) निरंतर वर्तमान म्हणजे अस्तित्वात असतो (अमृतम्) तो कारणरूपेण अविनाशी असून (च) आणि (मर्त्यम्) नाशवान कार्याला (निवेशयन्) आपापल्या कक्षेत स्थापित करतो (विद्युतशक्ती कारणरूप असल्यामुळे नित्य आश्‍वर आहे, पण ग्रह-नक्षत्रादी, पृथ्वी कार्य असल्यामुळे अनित्य व नश्‍वर आहेत. तो विद्युदग्नी त्या ग्रहादींना कक्षेत गतिमान करतो, हा आशय आहे) तो अग्नी (हिरण्ययेन) आपल्या तेज स्वरूपाने तसेच (रथेन) रमणीय स्वरूपाने (सविता) ऐश्‍वर्यदाता आहे. असा तो अग्नीदेव (भुवनानि) संसारस्थ पदार्थांना (याति) संचारित असतो. त्या शक्तीचे, हे विद्वान, आपण (पश्यन्) अध्ययन, निरीक्षण करीत आपण त्याचा सम्यक् प्रकारे उपयोग करा. ॥31।
Essence
भावार्थ - हे मनुष्यानो, जो विद्युतरूप अग्नी कार्य व कारण यांना सम्यक प्रकारे प्रकाशित करतो, सर्व अभिव्याप्त असून तेजस्वरूप, शीघ्रगामी आहे आणि सर्व पदार्थाना आकर्षित करणारा आहे, त्याचे निरीक्षण-परीक्षण करीत त्या शक्तीचा उपयोग करा पाहिजे आणि आवश्यक त्या स्थानी त्या शक्तीला नेले पाहिजे. ॥31॥
Subject
विद्युतद्वारे कोणती कार्यें पूर्ण केली पाहिजेत, याविषयी -