Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 34 / Mantra 26

58 Mantra
34/26
Devata- सविता देवता Rishi- आङ्गिरसो हिरण्यस्तूप ऋषिः Chhand- विराट् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
हिर॑ण्यहस्तो॒ऽअसु॑रः सुनी॒थः सु॑मृडी॒कः स्ववाँ॑ यात्व॒र्वाङ्।अ॒प॒सेध॑न् र॒क्षसो॑ यातु॒धाना॒नस्था॑द् दे॒वः प्र॑तिदो॒षं गृ॑णा॒नः॥२६॥

हिर॑ण्यहस्त॒ इति॒ हिर॑ण्यऽहस्तः। असु॑रः। सु॒नी॒थ इति॑ सुऽनी॒थः। सु॒मृ॒डी॒क इति॑ सुमृडी॒कः। स्ववा॒निति॒ स्वऽवा॑न्। या॒तु॒। अ॒र्वाङ् ॥ अ॒प॒सेध॒न्नित्य॑प॒ऽसेध॑न्। र॒क्षसः॑। या॒तु॒धाना॒निति॑ यातु॒ऽधाना॑न्। अस्था॑त्। दे॒वः। प्र॒ति॒दो॒षमिति॑ प्रतिऽदो॒षम्। गृ॒णा॒नः ॥२६ ॥

Mantra without Swara
हिरण्यहस्तोऽअसुरः सुनीथः सुमृडीकः स्ववा यात्वर्वाङ् । अपसेधन्रक्षसो यातुधानानस्थाद्देवः प्रतिदोषङ्गृणानः ॥

हिरण्यहस्त इति हिरण्यऽहस्तः। असुरः। सुनीथ इति सुऽनीथः। सुमृडीक इति सुमृडीकः। स्ववानिति स्वऽवान्। यातु। अर्वाङ्॥ अपसेधन्नित्यपऽसेधन्। रक्षसः। यातुधानानिति यातुऽधानान्। अस्थात्। देवः। प्रतिदोषमिति प्रतिऽदोषम्। गृणानः॥२६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (हिरण्यहस्तः) सोनेरी किरणें हीच ज्याचे हात आहेत, असा (सुनीथः) सर्वांना सुंदर प्रिय रूपाने पुढे नेणारा (कार्यप्रवण करणारा) (असुरः) जल आदीना शोषणारा व फेकणारा, तसेच (सुमृडीकः) सुंदर सुखकर आणि (स्ववान्) आपल्या प्रकाश आदी गुणांमुळे सर्व हितकारी असा (देवः) प्रकाशदाता सूर्यलोक (यातुधानान्) अन्यायाने अन्यजनांचे धन हरण करणार्‍या (रक्षसः) लुटारू, दरोडेखोर, चोर आदींना (अपसेधन्) दुष्कर्मांपासून निवृत्त करतो म्हणजे ते लुटारू, चोर आदी दुष्टलोक सूर्योदय झाल्यानंतर आपली दुष्कर्में करू शकत नाहीत, मात्र सूर्य आकाशात नसतांना रात्रीच्या अंधकारात ते आपला हेतू साध्य करतात. अशा प्रकारे (प्रतिदोषम्) मनुष्यांतील जे चोरी आदी दोष आहेत, ते (गृणानः) दूर करीत तो सूर्य (अस्थात) उदित होतो. (अर्वाङ्) आपल्या समीपस्थ वस्तूंना अधिक प्रभावाने प्राप्त होणारा तो सूर्य आम्हा मनुष्य समाजाच्या (यातु) सुखाकरिता असो. ॥26॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यानो, याचकासाठी उदारमनाने सुवर्ण आदीचे दान करीत जा. दुराचारी जनांचा तिरस्कार व निवारण सर्वांकडून प्रशंसित व्हा. ॥26॥
Subject
पुन्हा त्याच विषयी -