Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 34 / Mantra 25

58 Mantra
34/25
Devata- सविता देवता Rishi- आङ्गिरसो हिरण्यस्तूप ऋषिः Chhand- निचृज्जगती Swara- निषादः
Mantra with Swara
हिर॑ण्यपाणिः सवि॒ता विच॑र्षणिरु॒भे द्यावा॑पृथि॒वीऽअ॒न्तरी॑यते।अपामी॑वां॒ बाध॑ते॒ वेति॒ सूर्य्य॑म॒भि कृ॒ष्णेन॒ रज॑सा॒ द्यामृ॑णोति॥२५॥

हिर॑ण्यपाणि॒रिति॒ हिर॑ण्यऽपाणिः। स॒वि॒ता। विच॑र्षणि॒रिति॒ विऽच॑र्षणिः। उ॒भेऽइ॒त्यु॒भे। द्यावा॑पृथि॒वी इति॒ द्यावा॑पृथि॒वी। अ॒न्तः। ई॒य॒ते॒ ॥ अप॑। अमी॑वाम्। बाध॑ते। वेति। सूर्य्य॑म्। अ॒भि। कृ॒ष्णेन॑। रज॑सा। द्याम्। ऋ॒णो॒ति॒ ॥२५ ॥

Mantra without Swara
हिरण्यपाणिः सविता विचर्षणिरुभे द्यावापृथिवीऽअन्तरीयते । अपामीवाम्बाधते वेति सूर्यमभि कृष्णेन रजसा द्यामृणोति ॥

हिरण्यपाणिरिति हिरण्यऽपाणिः। सविता। विचर्षणिरिति विऽचर्षणिः। उभेऽइत्युभे। द्यावापृथिवी इति द्यावापृथिवी। अन्तः। ईयते॥ अप। अमीवाम्। बाधते। वेति। सूर्य्यम्। अभि। कृष्णेन। रजसा। द्याम्। ऋणोति॥२५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (हिरण्यपाणिः) जलाचा जो आकर्षणकर्ता असून त्याची प्रकाशमय किरणें हेच ज्याचे हात आहेत, आणि (विचर्षणिः) सर्व पदार्थ पाहणे ज्याच्यामुळे शक्य होते. असा (सविता) सर्व पदार्थांच्या उत्पत्तिचे कारण, तो (सूर्य्यम्) सूर्य जेव्हा (उभे) (द्यावापृथिवी) आकाश व पृथ्वी दोन्हीच्या (अन्तः) मधे (ईयते) उदित झाल्यानंतर येतो वा फिरतो, तेव्हां तो (अनीवाम्) व्याधिरूप अंधकाराला (अप, बाधते) दूर करतो आणि जेव्हा तो (वेति) अस्त होतो, तेव्हा (कृष्णेन) (रजसा) काळ्याकुट्ट अंधकाराद्वारे (द्याम्) आकाशाला (अभि, ऋणोति) सर्वत्र व्याप्त करतो. हे मनुष्यानो, तुम्ही या अशा सूर्याला जाणा (त्याचे गुण ओळखा) ॥25॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यानो, हे जाणून घ्यावी सूर्य आपल्या निकटच्या ग्रह-उपग्रहादींना आकर्षणशक्तीद्वारे धारण करतो. तसेच सूर्यलोक की ज्यामधे अनेक ग्रहादी समाहित आहेत, त्या समस्त सूर्यमंडळाला व्याप्त करून त्या सर्वांना आकर्षणशक्तीद्वारे एकत्रित ठेऊन ईश्‍वरच धारण करीत असतो. तुम्ही हे देखील जाणून घ्या की सर्व सृष्टीचा स्रष्टा आणि धर्त्ता ईश्‍वराशिवाय अन्य कोणी नाही आणि होऊ शकत नाही. ॥25॥
Subject
पुन्हा त्या विषयी -