Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 34 / Mantra 24

58 Mantra
34/24
Devata- सविता देवता Rishi- आङ्गिरसो हिरण्यस्तूप ऋषिः Chhand- भुरिक् पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
अ॒ष्टौ व्य॑ख्यत् क॒कुभः॑ पृथि॒व्यास्त्री धन्व॒ योज॑ना स॒प्त सिन्धू॑न्।हि॒र॒ण्या॒क्षः स॑वि॒ता दे॒वऽआगा॒द् दध॒द् रत्ना॑ दा॒शुषे॒ वार्य्या॑णि॥२४॥

अ॒ष्टौ। वि। अ॒ख्य॒त्। क॒कुभः॑। पृ॒थि॒व्याः। त्री। धन्व॑। योज॑ना। स॒प्त। सिन्धू॑न् ॥ हि॒र॒ण्या॒क्ष इति॑ हिरण्यऽअ॒क्षः। स॒वि॒ता। दे॒वः। आ। अ॒गा॒त्। दध॑त्। रत्ना॑। दा॒शुषे॑। वार्य्या॑णि ॥२४ ॥

Mantra without Swara
अष्टौ व्यख्यत्ककुभः पृथिव्यास्त्री धन्व योजना सप्त सिन्धून् । हिरण्याक्षः सविता देवऽआगाद्दधद्रत्ना दाशुषे वार्याणि ॥

अष्टौ। वि। अख्यत्। ककुभः। पृथिव्याः। त्री। धन्व। योजना। सप्त। सिन्धून्॥ हिरण्याक्ष इति हिरण्यऽअक्षः। सविता। देवः। आ। अगात्। दधत्। रत्ना। दाशुषे। वार्य्याणि॥२४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (हिरण्याक्षः) नेत्राप्रमाणे जो आपल्या प्रकाशाने वस्तूंचे रूप दर्शवितो, तो (सविता) (देव) प्रेरक सूर्य (दाशुषे) दानशील वा प्रार्थिप्राण्यासाठी (रत्ना) पृत्वीवरील उत्तम पदार्थ, (वाय्यार्णि) व वांछनीय पदार्थ (दधत्) धारण करतो (उत्पन्न करतो वा देतो) तो सुर्य (त्री) तीन (धन्व) अवकाश (योजना) म्हणजे बारा कोस आणि (सप्त) सात (सिन्धून्) पृथ्वी वरील समुद्रां पासून ते अकाशातील मेघमंडळापर्यंत प्रसृत समुद्रांना (जलसमूहांना) तसेच (पृथिव्याः) पृथ्वी वरील (अष्टौ) आ. (ककुभः) दिशांना (वि, अख्यात) प्रकाशित करतो. हे मनुष्यहो, तुम्हीही त्या सूर्याप्रमाणे व्हा (आपल्या गुणांचा व कीर्तीचा विस्तार करा) ॥24॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यानो, ज्याप्रमाणे सूर्यापासून पृथ्वी पर्यंत बाराकोस अंतरापर्यंत हलके वा भारी असे सात प्रकारचे पाण्याचे स्थान (वा जलसमूह) आहेत आणि सर्व दिशांचे विभाजन ठरते. आणि त्या आकाशातील वृष्टीमुळे सर्वांना सुख प्राप्त होते, त्याप्रमाणे तुम्ही आपल्या शुभ, गुण, कर्म आणि स्वभावाद्वारे दिशा दिशांतरापर्यंत आपली कीर्ती विस्तृत करा. स्वतः अनेक प्रकारचे ऐश्‍वर्य मिळवा आणि इतरांना देऊन मनुष्य आदी प्राण्यांना सुखी करा ॥24॥
Subject
सूर्य काय करतो, याविषयी -