Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 34 / Mantra 17

58 Mantra
34/17
Devata- इन्द्रो देवता Rishi- नोधा ऋषिः Chhand- निचृत् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
प्र वो॑ म॒हे महि॒ नमो॑ भरध्वमाङ्गू॒ष्यꣳ शवसा॒नाय॒ साम॑।येना॑ नः॒ पूर्वे॑ पि॒तरः॑ पद॒ज्ञाऽअर्च॑न्तो॒ऽअङ्गिरसो॒ गाऽअवि॑न्दन्॥१७॥

प्र। वः॒। म॒हे। महि॑। नमः॑। भ॒र॒ध्व॒म्। आ॒ङ्गू॒ष्य᳖म्। श॒व॒सा॒नाय॑। साम॑ ॥ येन॑। नः॒। पूर्वे॑। पि॒तरः॑। प॒द॒ज्ञा इति॑ पद॒ऽज्ञाः। अर्च॑न्तः। अङ्गि॑रसः। गाः। अवि॑न्दन् ॥१७ ॥

Mantra without Swara
प्र वो महे महि नमो भरध्वमाङ्गूष्यँ शवसानाय साम । येना नः पूर्वे पितरः पदज्ञाऽअर्चन्तो अङ्गिरसो गाऽअविन्दन् ॥

प्र। वः। महे। महि। नमः। भरध्वम्। आङ्गूष्यम्। शवसानाय। साम॥ येन। नः। पूर्वे। पितरः। पदज्ञा इति पदऽज्ञाः। अर्चन्तः। अङ्गिरसः। गाः। अविन्दन्॥१७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, (पदज्ञाः) जे आत्मस्वरूप ज्ञातव्य अथवा प्राप्तव्य आहे, ते जाणणार्‍या लोकांचा (नः) आम्ही (अर्चन्तः) सत्कार करतो, शिवाय ( अङ्गिरसः) सृष्टीविद्येची सर्व अंगे जाणणारे विद्वान आणि (पूर्वे) जे पुर्वज (पितरः) ज्ञानी जन होऊन गेले, (येन) त्यामुळे (महे) महान (शवसानाय) ब्रह्मचर्य, शारीरिक आणि आत्मिक बळ, धारण करणारे लोक (वः) तुम्हा लोकांतर्फे (आङ्गूष्यम्) सत्कार करण्यास पात्र आहेत. (विद्यमान विद्वान वा आत्मरूपयोगी, पूर्वी झालेल्या ज्ञानी जनांनी दिलेले ज्ञान आणि शारीरिक-आत्मिक शक्ती देणारे उपदेशक व अध्यापक यांचा तुम्ही सामान्य जनांनी सत्कार केला पाहिजे. त्यांनी तुम्हाला (साम) सामवेद आणि (गौः) सुसंस्कृत वाणी (अविन्दन्) प्राप्त करून दिली आहे. तुम्हीदेखील त्याप्रमाणे (महि) मोठ्या सत्कार समारोहात (नमः) उत्तम कर्म व उत्तम भोजनादीद्वारा त्यांना (प्र, भरध्वम्) धारण करा (त्यांचा आदर-सत्कार करा ॥17॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. हे मनुष्यानो, जे विद्वज्जन विद्या आणि उत्तम शिक्षण देऊन आम्हाला धर्मात्मा करतात, त्या प्रथम प्रख्यात पंडितांनाच तुम्ही पितर माना (मृत पूर्वजांना पितर म्हणू नका) ॥17॥
Subject
पितर कोणास म्हणावे अथवा पितर कोण असतात, -