Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 34 / Mantra 16

58 Mantra
34/16
Devata- इन्द्रो देवता Rishi- नोधा ऋषिः Chhand- विराट् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
प्र म॑न्महे शवसा॒नाय॑ शू॒षमा॑ङ्गू॒षं गिर्व॑णसेऽअङ्गिर॒स्वत्।सु॒वृ॒क्तिभिः॑ स्तुव॒तऽऋ॑ग्मि॒यायार्चा॑मा॒र्कं नरे॒ विश्रु॑ताय॥१६॥

प्र। म॒न्म॒हे॒। श॒व॒सा॒नाय॑। शू॒षम्। आ॒ङ्गू॒षम्। गिर्व॑णसे। अ॒ङ्गि॒र॒स्वत् ॥ सु॒वृ॒क्तिभि॒रिति॑ सुवृ॒क्तिऽभिः॑ स्तु॒व॒ते। ऋ॑ग्मियाय॑। अर्चा॑म। अ॒र्कम्। नरे॑। विश्रु॑ता॒येति॒ विऽश्रु॑ताय ॥१६ ॥

Mantra without Swara
प्रम्मन्महे शवसानाय शूषमाङ्गूषङ्गिर्वणसेऽअङ्गिरस्वत् । सुवृक्तिभि स्तुवतऽऋग्मियायार्चामार्कन्नरे विश्रुताय ॥

प्र। मन्महे। शवसानाय। शूषम्। आङ्गूषम्। गिर्वणसे। अङ्गिरस्वत्॥ सुवृक्तिभिरिति सुवृक्तिऽभिः स्तुवते। ऋग्मियाय। अर्चाम। अर्कम्। नरे। विश्रुतायेति विऽश्रुताय॥१६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, ज्याप्रमाणे आम्ही (विद्वज्जन) (सुवृक्तिभिः) निर्दोषकर्माद्वारे (शवसानाय) ज्ञान विज्ञानाच्या प्राप्तीसाठी (गिर्वणसे) सुसंस्कृत वाणी (बोलतो) आणि (ऋग्मियाय) ऋचा-पाठक लोक जसे (विश्रुताय) गुणयुक्त आणि प्रशंसनीय (स्तुवते) शास्त्रांचे कथन (वा वाचन) करतात, (तसे तुम्ही सामान्यजनांनी देखील केले पाहिजे) या शिवाय जसे (नरे) आम्ही विद्वान नायक मनुष्यासाठी (अङ्गिरस्वत्) प्राणाप्रमाणे प्रिय असे (आङ्गूषम्) विदया आणि शास्त्रवान व (शूषम्) शक्ती (प्र, मन्महे) ची कामना करतो आणि या (अर्कम्) पूजनीय व्यक्तीचा (अर्चाम) सत्कार करतो, त्याप्रमाणे तुम्ही देखील या विद्वानाचा सत्कार करा. ॥16॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा आणि वाचकलुप्तोपमा अलंकार आहेत (अंगिरस-वत्) या शब्दात उपमा अलंकार आहे) मनुष्यांचे कर्तव्य आहे की जी माणसे सत्कारास पात्र असतात त्यांचा त्यांनी सत्कार करावा आणि जे निरादर करण्यासारखे असतात, त्यांचा निरादर करून त्यांना दूर ठेवावे. अशा प्रकारे धर्म आणि विद्येची सदा उन्नती केली पाहिजे ॥16॥
Subject
मनुष्यांनी धर्म आणि विद्या, यांची वृद्धी करावी, याविषयी -