Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 34 / Mantra 15

58 Mantra
34/15
Devata- अग्निर्देवता Rishi- देवश्रवदेववातौ भारतावृषी Chhand- विराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
इडा॑यास्त्वा प॒दे व॒यं नाभा॑ पृथि॒व्याऽअधि॑।जात॑वेदो॒ नि धी॑म॒ह्यग्ने॑ ह॒व्याय॒ वोढ॑वे॥१५॥

इडा॑याः। त्वा॒। प॒दे। व॒यम्। नाभा॑। पृ॒थि॒व्याः। अधि॑ ॥ जात॑वेद॒ इति॑ जात॑ऽवेदः। नि। धी॒म॒हि॒। अग्ने॑। ह॒व्याय॑। वोढ॑वे ॥१५ ॥

Mantra without Swara
इडायास्त्वा पदे वयन्नाभा पृथिव्याऽअधि । जातवेदो नि धीमह्यग्ने हव्याय वोढवे ॥

इडायाः। त्वा। पदे। वयम्। नाभा। पृथिव्याः। अधि॥ जातवेद इति जातऽवेदः। नि। धीमहि। अग्ने। हव्याय। वोढवे॥१५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (जातवेदः) जागृत वा सदैव सावध बुद्धी असणारे (अग्ने) अग्नीवत् तेजस्वी हे विद्वान राजा, (वयम्) आम्ही अध्यापक आणि उपदेशगण (इडायाः) प्रशंसनीय वाणीच्या (पदे) अधीन राहून (चांगले वचन बोलत) (पृथिव्याः) विशाल भूमीच्या (अधि) वर (भूतलावर) तसेच (नाभा) मध्यभागीं (त्वा) आपणाला (हव्याय) देण्यास योग्य असे पदार्थ (वोढवे) देण्यासाठी अथवा प्राप्त करून देण्यासाठी (नि, धीमहि) निरंतर वा सदा स्थापित करीत आपले (आमच्याजवळ निवास करण्यासाठी विनंती करीत आहोत) (राजा आमच्याजवळ असल्यामुळे आम्हांस भय राहणार नाही) ॥15॥
Essence
भावार्थ - हे विद्वान राजा, आम्ही (प्रजाजन अध्यापक वा उपदेशकगण) आपणांस ज्या अधिकारपदावर स्थापित करीत आहोत, (सभापती, सेनाध्यक्ष, न्यायाधीश आदी पदावर नेमत आहोत,) आपण त्या पदाची कर्तव्यकर्में धर्ममार्गाने व पुरुषार्थ प्रयत्नाने यथोचित पूर्ण करा. ॥15॥
Subject
राज्यकार्यासाठी वा राज्यपदावर कशाप्रकारच्या मनुष्याची नेमणूक करावी, याविषयी -