Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 34 / Mantra 14

58 Mantra
34/14
Devata- अग्निर्देवता Rishi- देवश्रवदेववातौ भारतावृषी Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
उ॒त्ता॒नाया॒मव॑ भरा चिकि॒त्वान्त्स॒द्यः प्रवी॑ता॒ वृष॑णं जजान।अ॒रु॒षस्तू॑पो॒ रुश॑दस्य॒ पाज॒ऽइडा॑यास्पु॒त्रो व॒युने॑ऽजनिष्ट॥१४॥

उ॒त्ता॒नाया॑म्। अव॑। भ॒र॒। चि॒कि॒त्वान्। स॒द्यः। प्रवी॑तेति॒ प्रऽवी॑ता। वृष॑णम्। ज॒जा॒न॒ ॥ अ॒रु॒षस्तू॑प॒ इत्य॑रु॒षऽस्तू॑पः। रुश॑त्। अ॒स्य॒। पाजः॑। इडा॑याः। पु॒त्रः। व॒युने॑। अ॒ज॒नि॒ष्ट॒ ॥१४ ॥

Mantra without Swara
उत्तानायामव भरा चिकित्वान्त्सद्यः प्रवीता वृषणञ्जजान । अरुषस्तूपो रुशदस्य पाजऽइडायास्पुत्रो वयुने जनिष्ट ॥

उत्तानायाम्। अव। भर। चिकित्वान्। सद्यः। प्रवीतेति प्रऽवीता। वृषणम्। जजान॥ अरुषस्तूप इत्यरुषऽस्तूपः। रुशत्। अस्य। पाजः। इडायाः। पुत्रः। वयुने। अजनिष्ट॥१४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान महोदय, आपण (चिकित्वान्) ज्ञानवान आणि (प्रवीता) सर्वांनी आपली कामना करावी, असे प्रिय आहात आणि (उत्तानायाम्) त्या उन्नत वा विस्तृतभूमी मधे तसेच आकाशामधे (वृषणम्) वृष्टिकारक यज्ञ (जजान) करता (वा त्याचा विस्तार भूमी आकाशा पर्यंत करता) तसेच आपल्याप्रमाणे (अरुषस्तूपः) रक्षक मनुष्यांची उन्नती करणारा (इडायाः) प्रसिद्ध स्त्रीचा (पुत्रः) पुत्र देखील (त्वयुने) विज्ञानक्षेत्रात (अजनिष्ट) प्रसिद्ध आहे आणि (अस्य) या पुत्राचे (रुषत्) सुंदर रूप आणि (पाजः) बळ सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणे हे विद्वान, आपणही आम्हाला (सद्यः) शीघ्र (अव, भर) आपल्या रक्षणात घ्या आणि सर्वतः आम्हास पुष्ट, नीरोग करा. ॥14॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जर मनुष्यांनी या जगात स्वतः ब्रह्मजर्याचे पालन करून आपल्या मुला-मुलीनांही ब्रह्मचारी-ब्रह्मचारीणी करीत त्यांना द्विज केले (विद्वान व सदाचारी केले), तर समाजातील सर्व जण लवमरच विद्यावान होतील. ॥14॥
Subject
विद्वज्जनांनी काय करावे, याविषयी -