Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 34 / Mantra 13

58 Mantra
34/13
Devata- अग्निर्देवता Rishi- हिरण्यस्तूप आङ्गिरस ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
त्वं नो॑ऽअग्ने॒ तव॑ देव पा॒युभि॑र्म॒घोनो॑ रक्ष त॒न्वश्च वन्द्य।त्रा॒ता तो॒कस्य॒ तन॑ये॒ गवा॑म॒स्यनि॑मेष॒ꣳ रक्ष॑माण॒स्तव॑ व्र॒ते॥१३॥

त्वम्। नः॒। अ॒ग्ने॒। तव॑। दे॒व॒। पा॒युभि॒रिति॑ पा॒युऽभिः॑। म॒घोनः॑। र॒क्ष॒। त॒न्वः᳖। च॒। व॒न्द्य॒ ॥ त्रा॒ता। तो॒कस्य॑। तन॑ये॒ गवा॑म्। अ॒सि॒। अनि॑मेष॒मित्यनि॑मेषम्। रक्ष॑माणः॒। तव॑। व्र॒ते ॥१३ ॥

Mantra without Swara
त्वन्नोऽअग्ने तवे देव पायुभिर्मघोनो रक्ष तन्वश्च वन्द्य । त्राता तोकस्य तनये गवामस्यनिमेषँ रक्षणस्तव व्रते ॥

त्वम्। नः। अग्ने। तव। देव। पायुभिरिति पायुऽभिः। मघोनः। रक्ष। तन्वः। च। वन्द्य॥ त्राता। तोकस्य। तनये गवाम्। असि। अनिमेषमित्यनिमेषम्। रक्षमाणः। तव। व्रते॥१३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (देव) उत्तम गुण, कर्म आणि स्वभाव याने संपन्न असलेल्या (अग्ने) हे राजा अथवा हे ईश्‍वर, (तव) तुमच्या (व्रते) (तुम्ही ठरवून दिलेल्या) हितकारी नियमात राहून (मगोनः) अती व ऐश्‍वर्यवान आम्हा लोकांना (तव) आपल्या (पायुभिः) रक्षणादी उपायांनी (त्वम्) आपण (रक्ष) आमचे रक्षण करा (श्रीमंतांच्या धनाचे राजाने रक्षण करावे) (च) तसेच (नः) आमच्या (तन्वः) देहाचे ही रक्षण करा. हे (वन्द्य) स्तुत्य परमेश्‍वर, आपण (अनिमेषम्) सतत (रक्षमाणः) आमची रक्षा करीत (तोकस्य) आमच्या संततीचे (तनये) पुत्र-पौत्रादींचे तसेच (गवाम्) आमच्या गौ आदी पशूंचे (त्राता) रक्षणकर्ता (असि) आहात. यामुळे आपण आमच्यासाठी सदैव सत्कारणीय आणि उपासनीय आहात. ॥13॥
Essence
भावार्थ - या मंत्रात श्‍लेष अलंकार आहे. (‘देव’ आणि ‘अग्ने’ या शब्दात श्लेषा आहे, कारण या शब्दाचे एकापेक्षा अधिक म्हणजे दोन अर्थ निघत आहेत) जे मनुष्य ईश्‍वराच्या गुण, कर्म आणि स्वभावाप्रमाणे वागून त्याच्याच आज्ञेप्रमाणे आचरण करतात, त्यांची ईश्‍वर आणि विद्वज्जन अवश्य रक्षा करतात. अशी माणसे धनवान, दीर्घायू आणि संतानवान होतात. ते निःसंतान राहत नाहींत ॥13॥
Subject
राजाची आणि ईश्‍वराची सेवा कशी करावी, याविषयी -