Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 34 / Mantra 1

58 Mantra
34/1
Devata- मनो देवता Rishi- शिवसङ्कल्प ऋषिः Chhand- विराट् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
यज्जाग्र॑तो दू॒रमु॒दैति॒ दैवं॒ तदु॑ सु॒प्तस्य॒ तथै॒वैति॑।दू॒र॒ङ्ग॒मं ज्योति॑षां॒ ज्योति॒रेकं॒ तन्मे॒ मनः॑ शि॒वस॑ङ्कल्पमस्तु॥१॥

यत्। जाग्र॑तः। दू॒रम्। उ॒दैतीत्यु॒त्ऽऐति॑। दैव॑म्। तत्। ऊँ॒ इत्यूँ। सु॒प्तस्य॑। तथा॑। ए॒व। एति॑ ॥ दू॒र॒ङ्गममिति॑ दू॒रम्ऽग॒मम्। ज्योति॑षाम्। ज्योतिः॑। एक॑म्। तत्। मे॒। मनः॑। शि॒वस॑ङ्कल्प॒मिति॑ शि॒वऽस॑ङ्कल्पम्। अ॒स्तु॒ ॥१ ॥

Mantra without Swara
यज्जाग्रतो दूरमुदैति दैवन्तदु सुप्तस्य तथैवैति। दूरङ्गमञ्ज्योतिषाञ्ज्योतिरेकन्तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु॥

यत्। जाग्रतः। दूरम्। उदैतीत्युत्ऽऐति। दैवम्। तत्। ऊँ इत्यूँ। सुप्तस्य। तथा। एव। एति॥ दूरङ्गममिति दूरम्ऽगमम्। ज्योतिषाम्। ज्योतिः। एकम्। तत्। मे। मनः। शिवसङ्कल्पमिति शिवऽसङ्कल्पम्। अस्तु॥१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ- हे जगदीश्‍वर अथवा हे राजन्, आपल्या कृपेने (यत्) जे (दैवम्) आत्म्यात राहणारे आणि जीवात्म्याचे साधन असलेले (माझे मन) (दूरंगमम्) दूर-दूर जाणारे अथवा माणसाला दूर घेऊन जाणारे अथवा अनेक पदार्थांचे ग्रहण करणारे आहे. (ज्योतिषाम्) ते शब्द आदी विषयांचा प्रकाशक असून श्रोत्र आदी इंद्रियांने (ज्योतिः) प्रवृत्त करणारे असे (एकम्) एकमेव आहे ते (जाग्रतः) जागृत दशेत (दूरम्) दूर-दूर (उत्, एति) धावते (उ) आणि (तत्) तेच मन (सुप्तस्य) झोपलेल्या दशेतही (तथा, एव) त्याच प्रकारे (एति) धावते वा अंतःकरणात जाते. हे परमेश्‍वर, माझे (तत्) ते संकल्प विकल्पात्मक मन आपल्या कृपेने (शिवसंकल्पम्) कल्याणकारी धर्मविषयक प्रवृत्ती असलेले (अस्तु) व्हावे. (अशी मी प्रार्थना करतो) ॥1॥
Essence
भावार्थ - जी माणसें परमेश्‍वराच्या आज्ञेचे पालन करून आणि विद्वानांची संगती करून अनेकविध सामर्थ्याने संपन्न मनाला शुद्ध करतात. जे मन जागृत दशेत अनेक व्यवहार करते, तेच सुषुप्ती दशेत शांत होते. वेगवान पदार्थापैकी अति वेगवान व ज्ञानाचे साधन, इंद्रिय-प्रवर्त्तक या मनाला जे वश करतात, ते अशुभ व्यवहारांचा त्याग करून मनाला शुभ कार्यात प्रवृत्त करतात. ॥1॥
Subject
आता चौतिसाव्या अध्यायाचा आरंभ होत आहे. या अध्यायाच्या प्रथम मंत्रात मनाला वश करणे या विषयी सांगितले आहे.-