Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 97

97 Mantra
33/97
Devata- महेन्द्रो देवता Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- स्वराट् सतो बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
अ॒स्येदिन्द्रो॑ वावृधे॒ वृष्ण्य॒ꣳ शवो॒ मदे॑ सु॒तस्य॒ विष्ण॑वि।अ॒द्या तम॑स्य महि॒मान॑मा॒यवोऽनु॑ ष्टुवन्ति पू॒र्वथा॑।इ॒मा उ त्वा। यस्या॒यम्। अ॒यꣳ स॒हस्र॑म्। ऊ॒र्ध्वऽऊ॒ षु णः॑॥९७॥

अ॒स्य। इत्। इन्द्रः॑। वा॒वृ॒धे॒। व॒वृ॒ध॒ऽइति॑ ववृधे। वृष्ण्य॑म्। शवः॑। मदे॑। सु॒तस्य॑। विष्ण॑वि ॥ अ॒द्य। तम्। अ॒स्य॒ म॒हि॒मान॑म्। आ॒यवः॑। अनु॑। स्तु॒व॒न्ति॒। पू॒र्वथेति॑ पू॒र्वऽथा॑ ॥९७ ॥

Mantra without Swara
अस्येदिन्द्रो वावृधे वृष्ण्यँ शवो मदे सुतस्य विष्णवि । अद्या तमस्य महिमानमायवोनुष्टुवन्ति पूर्वथा । इमाऽउ त्वा । यस्यायमयँ सहस्रमूर्ध्वऽऊ षु णः॥

अस्य। इत्। इन्द्रः। वावृधे। ववृधऽइति ववृधे। वृष्ण्यम्। शवः। मदे। सुतस्य। विष्णवि॥ अद्य। तम्। अस्य महिमानम्। आयवः। अनु। स्तुवन्ति। पूर्वथेति पूर्वऽथा॥९७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (इन्द्रः) परमैश्‍वर्यवान राजा, (विष्णवी) सर्वव्यापी परमेश्‍वराने (सुतस्य) उत्न्न केलेल्या (अस्य) या जगात (मदे) आनंदप्राप्त्यर्थ (वृष्ण्यम्) पराक्रम आणि (शवः) आपली शक्ती व जल (अद्य) यां वर्तमानकाळी (वावृधे) वाढवीत आहे. (अस्य) या परमेश्‍वराचा (इत्)(महिमानम्) महिमा (पूर्वथा) पूर्वज लोकांप्रमाणे (आयवः) आपले कर्मफळ प्राप्त करणारे आजचे लोक (अनु, स्तुवन्ति) अनुकुलतेने सांगत आहेत वा त्याची स्तुती करीत आहेत. (तम्)हे मनुष्यानो, त्या परमेश्‍वराला तुम्हीही जाणा व त्याची स्तुती करा. ॥97॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, जर तुम्ही सर्वव्यापी, सर्वजगदुत्पादक, सर्वाधार, उत्तम ऐश्‍वर्यप्रापक परमेश्‍वराच्या आज्ञेप्रमाणे वागून त्याचा महिमा जाणून घेऊन सर्व जगावर उपकार कराल, तर तुम्ही निरंतर आनंदी व्हाल. ॥97॥
Subject
मनुष्यांसाठी ईश्‍वराची स्तुती करणे उचित आहे -
Footnote
(तळटीप - चिन्हांकित चार प्रतीकें पूर्वी अ. ३३ मंत्र ८१-८३ आणि अ. ११ मंत्र ४२ मधे आलेली आहेत. ती तेथे कर्मकाण्डाच्या पूर्ततेसाठी वापरली आहेत. अर्थ तेथे पहावा)^या अध्यायात अग्नी, प्राण, उदान, दिन, रात्रि, सूर्य, अग्नी, राजा, ऐश्‍वर्य, उत्तम यान, विद्वान, लक्ष्मी, वैश्‍वावर, ईश्‍वर, इन्द्र, बुद्धी, वरूण, अश्‍वि, अन्न, सुर्य, प्रजा, परीक्षक, इन्द्र आणि वायू आदी पदार्थांच्या गुणांचे वर्णन केले आहे. त्यामुळे या (तेहतिसाव्या) अध्यायाच्या अर्थाची संगती पूर्वीच्या (बत्तीसाव्या) अध्यायात सांगितलेल्या अर्थाशी आहे, असे जाणावे ॥^यजुर्वेद हिन्दी भाष्याचा मराठी अनुवाद ३३ वा अध्याय समाप्त