Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 96

97 Mantra
33/96
Devata- इन्द्रो देवता Rishi- नृमेध ऋषिः Chhand- निचृद् बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
प्र व॒ऽइन्द्रा॑य बृह॒ते मरु॑तो॒ ब्रह्मा॑र्चत।वृ॒त्रꣳ ह॑नति वृत्र॒हा श॒तक्र॑तु॒र्वज्रे॑ण श॒तप॑र्वणा॥९६॥

प्र। वः॒। इन्द्रा॑य। बृ॒ह॒ते। मरु॑तः। ब्रह्म॑। अ॒र्च॒त॒ ॥ वृ॒त्रम्। ह॒न॒ति॒। वृ॒त्र॒हेति॑ वृत्र॒ऽहा। श॒तक्र॑तु॒रिति॑ श॒तऽक्र॑तुः। वज्रे॑ण। श॒तप॑र्व॒णेति॑ श॒तऽप॑र्वणा ॥९६ ॥

Mantra without Swara
प्र वऽइन्द्राय बृहते मरुतो ब्रह्मार्चत । वृत्रँ हनति वृत्रहा शतक्रतुर्वज्रेण शतपर्वणा ॥

प्र। वः। इन्द्राय। बृहते। मरुतः। ब्रह्म। अर्चत॥ वृत्रम्। हनति। वृत्रहेति वृत्रऽहा। शतक्रतुरिति शतऽक्रतुः। वज्रेण। शतपर्वणेति शतऽपर्वणा॥९६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (मरुतः) मनुष्यांनो, (शतक्रतुः) अगणित प्रकारची बुद्धी (विचार, रणनीती आदी) तसेच अनेक योजना, कार्यें संपन्न करणारा सेनापती (शतपर्वणा) असंख्य प्राण्यांचे रक्षण करणार्‍या (वज्रेण) अस्त्र-शस्त्रा द्वारे (शत्रूंना ठार करतो) की जसा (वृत्रहा) मेघहन्ता सूर्य (वृत्रम्) मेघमंडळाला छिन्न-भिन्न करतो. तसा तो सेनापती (बृहते) महान (इन्द्राय) परमैश्‍वरप्राप्तीसाठी शत्रूंना (हनति) ठार करतो आणि (वः) तुम्हा प्रजाजनांसाठी (ब्रह्म) धन आणि अन्न प्राप्त करतो त्या सेनापतीचा तुम्ही (प्र, अर्वत) अवश्य सत्कार करा. ॥96॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. हे मनुष्यांनो, जे लोक, सूर्य जसा मेघमालेला, तसे तुमच्या शत्रूला ठार करून तुमच्या ऐश्‍वर्याची वृद्धी करतात, त्यांचा (राजा, रापुरुष आदींचा) तुम्ही सम्मान-सत्कार करीत जा. नेहमी तुम्ही त्यांचे कृतज्ञ राहून महान ऐश्‍वर्य प्राप्त करा. ॥96॥
Subject
मनुष्यांनी काय केले पाहिजे, याविषयी -