Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 94

97 Mantra
33/94
Devata- विश्वेदेवा देवताः Rishi- मनुर्ऋषिः Chhand- पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
दे॒वासो॒ हि ष्मा॒ मन॑वे॒ सम॑न्यवो॒ विश्वे॑ सा॒कꣳसरा॑तयः।ते नो॑ऽअ॒द्य ते अ॑प॒रं तु॒चे तु नो॒ भव॑न्तु वरिवो॒विदः॑॥९४॥

दे॒वासः॑। हि॑। स्म॒। मन॑वे। सम॑न्यव॒ इति॒ सऽम॑न्यवः। विश्वे॑। सा॒कम्। सरा॑तय॒ इति॒ सऽरा॑तयः ॥ ते। नः॒। अ॒द्य। ते। अ॒प॒रम्। तु॒चे। तु। नः॒। भव॑न्तु। व॒रि॒वो॒विद॒ इति॑ वरिवः॒ऽविदः॑ ॥९४ ॥

Mantra without Swara
देवासो हि ष्मा मनवे समन्यवो विश्वे साकँ सरातयः । ते नोऽअद्य तेऽअपरन्तुचे तु नो भवन्तु वरिवोविदः ॥

देवासः। हि। स्म। मनवे। समन्यव इति सऽमन्यवः। विश्वे। साकम्। सरातय इति सऽरातयः॥ ते। नः। अद्य। ते। अपरम्। तुचे। तु। नः। भवन्तु। वरिवोविद इति वरिवःऽविदः॥९४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, (सरातयः) निरंतर दान देणारे आणि (समन्यवः) समान क्रोध करणारे (अज्ञान व अन्यायावर तुटून पडणारे असे) (विश्‍वे) सर्व (देवासः) विद्वज्जन (साकम्) सोबत राहून (अद्य) आज (नः) आम्हां (मनवे) आमच्यासारख्या मनुष्यांना (स्म) प्रसिद्धी देणारे आणि (वरिवोविदः) आमचा सत्कार करणारे व धन देणारे (भवन्तु) व्हावेत (अशी आम्ही कामना करतो.) (तु) या शिवाय (ते) ते विद्वान (अपरम्) भविष्यातही (नः) आमच्या (तुचे) पुत्र-पौत्र आदींकरता आमच्यातर्फे सत्कार करविणारे व त्यांना आमच्यातर्फे धनाची प्राप्ती करविणारे व्हावेत (ज्याप्रमाणे विद्वानांनी आमचा सत्कार केला, त्याप्रमाणे आम्हीही आमच्या पुत्र-पौत्रादीना धन द्यावे व त्यांचा सम्मान करावा) (ते, हि) ते विद्वान तुम्हा इतर लोकांचाही सत्कार करणारे व धन देणारे असोत. ॥94॥
Essence
भावार्थ - जे लोक एकमेकास सुख-सहकार्य देत दुष्टांवर क्रोध करतात, ते पुत्र पौत्राच्या दृष्टीने आनंदी असतात आणि ते सर्वांची उन्नती करण्यात सक्षम असतात ॥94॥
Subject
कोण विद्वान होऊ शकतात, याविषयी -