Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 93

97 Mantra
33/93
Devata- इन्द्राग्नी देवते Rishi- सुहोत्र ऋषिः Chhand- भुरिगनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
इन्द्रा॑ग्नीऽअ॒पादि॒यं पूर्वागा॑त् प॒द्वती॑भ्यः।हि॒त्वी शिरो॑ जि॒ह्वया॒ वाव॑द॒च्चर॑त् त्रि॒ꣳशत् प॒दा न्य॑क्रमीत्॥९३॥

इन्द्रा॑ग्नी॒ऽइतीन्द्रा॑ग्नी। अ॒पात्। इ॒यम्। पूर्वा॑। आ। अ॒गा॒त्। प॒द्वती॑भ्यः॒ऽइति॑ प॒त्ऽवती॑भ्यः ॥ हि॒त्वी। शिरः। जि॒ह्वया॑। वाव॑दत्। चर॑त्। त्रि॒ꣳशत्। प॒दा। नि। अ॒क्र॒मी॒त् ॥९३ ॥

Mantra without Swara
इन्द्राग्नीऽअपादियम्पूर्वागात्पद्वतीभ्यः । हित्वी शिरो जिह्वया वावदच्चरत्त्रिँशत्पदा न्यक्रमीत् ॥

इन्द्राग्नीऽइतीन्द्राग्नी। अपात्। इयम्। पूर्वा। आ। अगात्। पद्वतीभ्यःऽइति पत्ऽवतीभ्यः॥ हित्वी। शिरः। जिह्वया। वावदत्। चरत्। त्रिꣳशत्। पदा। नि। अक्रमीत्॥९३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (इन्द्राग्नी) अध्यापक आणि उपदेशक जनहो, (इयम्) ही (अपात्) पाय नसलेली (पद्वतीभ्यः) पण पाय असलेल्या अनेक प्राण्यांच्या (पूवा) आधी उत्पन्न होतो आणि आकाशात (आ, जगात्) येतो (ती उषा- तो उषःकाळ तुम्ही जाणून घ्या. त्याचे लाभ ओळखा) ती उषा (शिरः) आपल्या मस्तकाला (हित्वी) सोडून म्हणजे शिर नसलेल्या पण अनेक प्राण्यांच्या (जिह्वया) वारीच्या माध्यमातून पाळते अर्थात् कोंबडा आदी पक्षी आरवतात. येथे कोंबड्यांची वाणी ही उषाःकाळावर आरोपित केली आहे. (चरत्) अशापक्रारे उषा पूर्व दिशेत विचरण करते. ही उषा (त्रिंशत्) तीस (पदा) चरणांद्वारे म्हणजे प्राप्तिसाधन असलेल्या तीस मुहूर्तांच्या माध्यमातून (नि, अक्रमीत) निरंतर मार्गाक्रमण करते. हे अध्यापक, उपदेशकजन, आपण या उषेचे महत्त्व ओळखा (व आम्हांस सांगा) ॥93॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यानो, उषा वेगवती आहे, पाय, डोकें आदी अवयव नसलेली, प्राणी उठण्याच्या आधीच जागी होणारी असून प्राण्यांच्या मुखाद्वारे बोलणारी आहे. ती उषा तीस मुहूर्त म्हणजे (साठ घटिका) नंतर प्रत्येक स्थानावर अधिकार करते. तुम्ही निद्रा व आळस त्यागून या उषेचे सेवन केले पाहिजे म्हणजे तुम्ही सुखी व्हाल ॥93॥
Subject
पुढील मंत्रात उषःकाळाविषयी -