Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 88

97 Mantra
33/88
Devata- अश्विनौ देवते Rishi- वसिष्ठ ऋषिः Chhand- निचृद् बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
आ या॑त॒मुप॑ भूषतं॒ मध्वः॑ पिबतमश्विना।दु॒ग्धं पयो॑ वृषणा जेन्यावसू॒ मा नो॑ मर्धिष्ट॒मा ग॑तम्॥८८॥

आ। या॒त॒म्। उप॑। भू॒ष॒त॒म्। मध्वः॑। पि॒ब॒त॒म्। अ॒श्वि॒ना॒ ॥ दु॒ग्धम्। पयः॑। वृ॒ष॒णा॒। जे॒न्या॒व॒सू॒ इति॑ जेन्याऽवसू। मा। नः॒। म॒र्धि॒ष्ट॒म्। आ। ग॒त॒म्। ॥८८ ॥

Mantra without Swara
आ यातमुप भूषतम्मध्वः पिबतमश्विना । दुग्धम्पयो वृषणा जेन्यावसू मा नो मर्धिष्टमा गतम् ॥

आ। यातम्। उप। भूषतम्। मध्वः। पिबतम्। अश्विना॥ दुग्धम्। पयः। वृषणा। जेन्यावसू इति जेन्याऽवसू। मा। नः। मर्धिष्टम्। आ। गतम्।॥८८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (वृषणा) पराक्रमी आणि (जेन्यावसू) युद्धात विजेता लोकांना योग्य त्या ठिकाणी वसविणारे अथवा ज्यांनी शत्रूंकडून भरपूर धन जिंकले आहे, (अश्‍विना) विदय आदी क्षेत्रात सद्गुणसंपन्न असे हे राजा आणि प्रजाजन, तुम्ही दोघे (आ, यातम्) उत्तमप्रकारे सुख प्राप्त करा. हे राजा, तुम्ही प्रजाजनांच्या (उप, भूषतम्) जवळ जाऊन त्यांची सत्कार-सम्मान करा. आणि (मध्वः) वैद्यकशास्त्राप्रमाणे तयार केलेला मधुर रस (पिबतम्) प्या. तसेच सर्वांसाठी (पयः) जल (दुग्धम्) उपलब्ध होईल, असे करा अर्थात पाण्याविना कोणी दुःखी राहू नये, तसेच (नः) आम्हाला (मा) (मर्द्धिष्टम्) मारू नका (वा आमची कोणती हानी होऊ देऊ नका.) आणि धर्ममार्गाने विजय (आ, गतम्) प्राप्त करा (अनीतीने नको) ॥88॥
Essence
भावार्थ -जे राजा राजपुरुष आणि प्रजेतील (शिक्षित विद्वज्जन) सर्वांना विद्या, सुशिक्षाद्वारे सुशोभित करतील, तसेच कालवे आदी निर्मित करून सर्वासाठी पाण्याची सोय करतील, तसेच श्रेष्ठ जनांना न मारता (वा त्रास न देता) दुष्टांना मात्र ताडना, वध आदीद्वारे दंडित करतील, ते विजयी होऊन अतुलनीय लक्ष्मी (धन-संपदा) प्राप्त करून अवश्य सुखी आनंदी होतील. ॥88॥
Subject
पुनश्‍च, तोच विषय-